अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-गेल्या काही महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर भारताचं PUBG गेमला उत्तर म्हणून सादर करण्यात आलेली गेम FAU-G आजपासून उपलब्ध झाली आहे.
दरम्यान हा गेम nCore Games कडून डिझाईन करण्यात आला आहे. PUBG Mobile ला हा पर्याय असल्याचं सांगण्यात येत आहे.
- भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर लोकप्रिय ऑनलाइन बॅटल रॉयल गेम PUBG भारतात बॅन झाल्यानंतर FAU-G गेमची घोषणा करण्यात आली होती. हा गेम आता अखेर उपलब्ध झाला आहे.
- अशा पद्धतीने डाऊनलोड करा FAU-G
- FAU-G म्हणजेच Fearless and United Guards हा गेम गूगल प्ले वर डाऊनलोडसाठी मोफत उपलब्ध आहे.
- युजर्सना प्ले स्टोअरवर जाऊन त्यांच्या अॅन्ड्रॉईड स्मार्टफोनमध्ये तो डाऊनलोड करता येईल. त्यासाठी त्यांना इंस्टॉल वर क्लिक करायचं आहे.
- Android 8 आणि पुढील सार्या स्मार्टफोन्समध्ये हा गेम चालणार आहे.
- लेव्हल अप करण्यासाठी इन अॅप परचेस चा पर्याय असण्याची शक्यता आहे.
- दरम्यान अद्याप iOS users साथी हा गेम कधी उपलब्ध होऊ शकेल याची माहिती देण्यात आलेली नाही.