अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-शेतकरीविरोधी असलेल्या तीन नव्या कृषी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे मागील दहा दिवसापासून सुरु असलेल्या आंदोलनाची केंद्रातील भाजप सरकार दखल घेत नसल्याने मंगळवार दि. 8 डिसेंबर भारत बंदची हाक देण्यात आली आहे.
या बंद मध्ये अहमदनगर जिल्हा कामगार आणि किसान संघटना संयुक्त कृती समिती उतरणार असल्याची माहिती अॅड. सुभाष लांडे व अविनाश घुले यांनी दिली. मंगळवारी देशव्यापी बंद मध्ये सहभागी होण्यासाठी शहरात फेरी काढून शांततेच्या मार्गाने आवाहन केले जाणार आहे.
तसेच सकाळी 11 वाजता मार्केटयार्ड चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन रास्ता रोको करण्यात येणार आहे. या संपात संघटनेशी संलग्न युनियन, शेतकरी, कामगार, सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, अंगणवाडी सेविका, मनपा कर्मचारी, आशा-गटप्रवर्तक, विडी कामगार, पतसंस्था कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, बाजार समिती, हमाल-मापाडी संघटना सहभागी होणार आहे.
टाळेबंदी काळात शेतकरी विरोधात केलेल्या कायद्यामुळे देशातील शेतकर्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. हे काळे कायदे रद्द होण्यासाठी सर्व शेतकरी एकवटले असून, त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देत मंगळवारचा देशव्यापी संप यशस्वी करण्यात येणार आहे.
या संपासाठी हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, आयटकचे अॅड.कॉ. सुभाष लांडे, अॅड.कॉ. सुधीर टोकेकर, बहिरनाथ वाकळे, किसान सभेचे अॅड. बन्सी सातपुते, कॉ. एल.एम. डांगे, कॉ. बाबा आरगडे, शांताराम वाळूंज, विकास गेरंगे, रामदास वागस्कर, अंबादास दौंड, नंदू डहाणे, सिटूचे कॉ. महेबुब सय्यद, संताराम लोणकर, महादेव पालवे, सरकारी कर्मचारी संघटनेचे सुभाष तळेकर, रावसाहेब निमसे,
विलास पेद्राम, शिक्षक संघटनेचे आप्पासाहेब शिंदे, महेंद्र हिंगे, राजेंद्र लांडे, प्रशांत म्हस्के, श्रमिक शेतकरी संघटनेचे राजेंद्र बावके, जीवन सुरडे, मनपा कर्मचारी युनियनचे अनंत लोखंडे, साखर कामगार युनियनचे आनंद वायकर, विडी कामगार युनियनच्या भारती न्यालपेल्ली, सतीश भुस, अर्शद शेख, नंदकुमार शिरोळे, शिक्षकेतर संघटनेचे भाऊसाहेब थोटे, सतीश पवार, योगेश गलांडे, आकाश दंडवते, अंगणवाडी सेविका संघटनेच्या शोभा तरोटे, विजया घोडके, सुभाष कांबळे आदि प्रयत्नशील आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved