अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पश्चिम बंगालच्या दुर्गापूरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली एक विमान अडकून पडलं होतं. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. ट्रेलरवर भारतीय पोस्टल खात्याचे जुने विमान एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी नेत असताना चालकाला धुक्यामुळे ओव्हर ब्रिज दिसला नाही. ओव्हर ब्रिजखाली विमान येताच विमान तिथेच अडकले.
हे विमान भारतीय पोस्टचे आहे. भारतीय पोस्टमधून हे विमान सेवामुक्त करण्यात आले आहे. विमान जुने आणि जीर्ण होऊ लागल्यामुळे ते उड्डाणासाठी वापरण्यात येत नव्हते. त्यामुळे हे विमान ट्रकच्या सहाय्याने दुसरीकडे हलवण्यात येत होते.
सोमवारी रात्री कोलकातावरुन जयपूर येथे हे विमान घेऊन जाण्यात येत होते. त्याचवेळी दुर्गापूर येथील एका पुलाखाली विमान घेऊन जाणारा ट्रक अडकला. 22 चाकांच्या ट्रकमधून हे विमान घेऊन जाण्यात येत होते.
हे विमान टपाल विभागाचे होते. त्यांचे अधिकारी आले. त्यांनी विमान काढण्यासाठी ट्रेलरची हवा काढली. पण यश मिळाले नाही. नंतर चाके काढली व विमानाच्या वरिल भाग गॅस कटरने कापले. तेव्हा विमान बाहेर काढता आले. अधिकाऱ्यांनी सांगितले, पुलाचे नुकसान टाळायचे होते. याआधीही चीनमध्ये असाच प्रकार घडला होता. ट्रकच्या चाकांची हवा सोडून विमान काढण्यात आले होते.