एअरटेलने जिओला टाकले मागे ; केलेय ‘असे’ काही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-नवीन मोबाइल ग्राहक जोडण्याच्या बाबतीत भारती एअरटेलने सप्टेंबरमध्ये रिलायन्स जिओला मागे टाकले आहे.गुरुवारी टेलिकॉम नियामक ट्रायने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, चार वर्षांच्या कालावधीनंतर असे घडले आहे.

रिलायन्स जिओ सप्टेंबर 2016 मध्ये आपल्या कमर्शियल ऑपरेशनच्या लॉन्च च्या सुरूवातीपासूनच मासिक मोबाइल सबस्क्रिप्शनमध्ये अव्वल स्थानावर होती. जेव्हा कंपनीने त्यांचे व्यवसाय सुरू केले तेव्हा कंपनीने 15.97 मिलियन नवीन ग्राहक जोडले.

व्होडाफोन आयडियास सर्वाधिक नुकसान :- सप्टेंबरमध्ये 3.77 मिलियन नवीन ग्राहकांसह मोबाइल ग्राहक वाढीमध्ये भारती एअरटेल आघाडीवर आहे. यानंतर रिलायन्स जिओने 1.46 मिलियनची भर घातली आणि बीएसएनएलने 78,454 नवीन ग्राहका जोडले आहेत.

व्होडाफोन आयडिया मागे आहे कारण या महिन्यात त्यांनी त्यांच्या 4.65 मिलियन ग्राहक गमावले आहेत. एमटीएनएल आणि रिलायन्स कम्युनिकेशन्सचे अनुक्रमे 5,784 आणि 1,324 ग्राहक कमी झाले आहेत. 404.12 मिलियन ग्राहकांसह एकूण मोबाइल सब्सक्राइबर च्या बाबतीत रिलायन्स जिओ बाजारात अग्रेसर आहे.

त्यानंतर 326.61 मिलियन सब्सक्राइबर्ससह भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया 295.49 मिलियन ग्राहक, बीएसएनएल 118.89 मिलियन सब्सक्राइबर्स आणि एमटीएनएल 3.33 मिलियन ग्राहक असे क्रम लागतात.

लँडलाईन ग्राहक देखील वाढले :- सप्टेंबर 2020 मध्ये एकूण वायरलेस किंवा मोबाईल टेलिफोन ग्राहकांची संख्या ऑगस्टमधील 1,147.92 मिलियन वरून वाढून 1,148.58 मिलियन झाली. ऑगस्टमधील 19.89 दशलक्षांच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये देशातील लँडलाईन ग्राहक 20.08 दशलक्षांवर पोचले आहेत.

खासगी लँडलाईन विभागात वाढ होण्यामागे खासगी ऑपरेटरांचा हात होता. रिलायन्स जिओने 3,03,205 हून अधिक ग्राहक जोडले आहेत. त्यानंतर भारती एअरटेलने 66,335 नवीन ग्राहक जोडले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24