Honda CB200X : भारतीय बाजारात अनेक नवनवीन बाईक लॉन्च होत आहेत. जर तुम्हीही नवीन बाईक खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल आणि कमी बजेटमुळे तुमचे स्वप्न पूर्ण होत नसेल तर काळजी करू नका. आता तुम्ही फक्त 17,000 रुपयांमध्ये बाईकचे मालक बनू शकता.
तुम्ही होंडा कंपनीची CB200X बाईक कमी पैशात घरी आणू शकता. यासाठी काही ऑफर दिल्या जात आहेत. त्या ऑफरचा फायदा घेऊन कमी किमतीमध्ये गाडीचे मालक बनू शकता. त्यामुळे आजच ऑफरचा लाभ घ्या.
होंडा CB200X बाईक
ही सुपर बाईक होंडा कंपनीने ऑटो इंडस्ट्रीमध्ये लॉन्च केली आहे. यात खूप चांगले डिझाइन आणि पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला जबरदस्त मायलेज पाहायला मिळेल. तुमुळे तुमचे इंधनावरही जास्त पैसे खर्च होणार नाहीत.
इंजिन पॉवर आणि मायलेज
या बाईकमध्ये तुम्हाला 184.4cc BS-VI 200cc 4 वाल्व ऑइल कोल्ड इंजिन देण्यात आले आहे जे 8508 RPM वर 17.2PS पॉवर आणि 6000 RPM वर 17.3 nm टॉर्क जनरेट करते. या बाईकच्या इंधन टाकीची क्षमता १२ लिटर देण्यात आली आहे. तसेच १४७ किलो या बाईकचे वजन आहे. ही बाईक ४० किमीचे मायलेज देत आहे.
किंमत आणि ऑफर
कंपनीकडून दिल्लीमध्ये या बाईकची ऑन रोड किंमत 1,72,530 रुपये ठेवण्यात आली आहे. पण जर तुमच्याकडे तेवढे पैसे नसतील तर तुम्ही फक्त 17000 रुपये डाऊनपेमेंट करून ते घरी नेऊ शकता.
बाकीच्या पैशाचे तुम्हाला बँकेकडून किंवा फायनान्स कंपनीकडून कर्ज दिले जाईल. 155530 कर्ज म्हणून दिले जाईल. त्यावर वार्षिक 9.7% दराने व्याज आकारले जाईल. तसेच दरमहा तुम्हाला ४९९७ रुपये हफ्ता भरावा लागेल.