अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- भारतीय कंपनी Lava ने जगातील पहिला फोन आपल्या मनाप्रमाणे फोनच्या सुविधा निर्माण करणारा फोन आला आहे.कस्टमाइजेबल फोन Lava MYz सादर केला आहे.
Lava ने जगातील पहिल्या स्मार्टफोन MyZ च्या लॉंचची घोषणा केली, जो कस्टमाइज केला जाऊ शकतो. खरेदीच्या आधी फोन कस्टमाइज करण्याची प्रक्रिया म्हणजे My-Z.यासंदर्भात कंपनीने अधिकृत घोषणा केली आहे.
मोबाईल ‘असा’ मिळवावा लागेल :- या यूनिक ‘Made-to-Order’ कॉन्सेप्ट मध्ये कस्टमरकडे 2GB, 3GB, 4GB आणि 6GB रॅम सह 32GB, 64GB आणि 128GB रोम कॉम्बिनेशन निवडण्याचा ऑप्शन मिळेल. तसेच रियर कॅमेरा ऑप्शनमध्ये डुअल (13+2MP) आणि ट्रिपल (13+5+2MP) कॅमेऱ्यासह फ्रंटला सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP आणि 16MP लेंसचा ऑप्शन मिळेल.
आपल्याला हा मोबाईल जर घ्यायचा असेल तर तुम्ही MyZ फोन विकत घेण्याचा विचार करत असाल, तर हा यूनिक ‘Made-to-Order’ डिवाइस लावा ई-स्टोअर www.lavamobiles.com वरून विकत घेता येईल.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार.. ऑन-द-स्पॉट अपग्रेडसाठी ग्राहकांना सर्विस सेंटरमध्ये आधी बुकिंग करावी लागेल. या अपग्रेडेशनसाठी काही शुल्क दयावे लागेल. तसेच ग्राहक नवीन फोनमध्ये डेटा ट्रांसफर करण्याच्या त्रासापासून पण वाचतील.
नवीन फोनच्या सिरीजबद्दल :- MyZ आणि Zup सीरीज मध्ये MediaTek Helio G35 ऑक्टा-कोर प्रोसेसर सह स्टॉक अँड्रॉइड 10 युजर इंटरफेस असेल जो ब्लोटवेयर फ्री प्यूोर अँड्रॉइड एकस्पीरियंस देईल.
तसेच फोन वॉटर ड्रॉप नॉच, HD+ डिस्प्ले 6.5″ (16.55 cm) सह कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन सह येईल. इतकेच नव्हे तर फोन मध्ये पॉवर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी आणि टाइप-सी चार्जिंग पोर्ट पण असेल.