अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- कोरोनामुळे गेले अनेक महिने अंड्याचे दार चांगलेच वाढू लागले होते. आता पुन्हा एकदा अंड्याच्या भावात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. थंडीचा तडाखा वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा अंड्यांच्या भावात वाढ झाली आहे.
अंड्यांच्या बाजार भावाने मागच्या 3-4 वर्षाचा रेकॉर्ड मोडला आहे. दिल्लीतील अंड्यांची किंमत 550 रुपये प्रति शेकडा होती. तर अधिकृत दर 521 रुपये इतके होते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 वर्षांपूर्वी अंडी 543 रुपये दराने विकली जात होती; पण आता थंडीमुळे दरांमध्ये आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अंड्याच्या वाढत्या भावामुळे ऐन थंडीत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे अंड्यांच्या किंमतीमध्ये मोठा घोळ होत आहे. कारण, मोठ्या मंडईमध्ये वेगळेच भाव आहेत तर दुकानांमध्ये वेगळ्याच भावाने अंडी विकली जातात.
कोंबड्यांमध्ये रोगराई पसरल्यामुळे अंडी उत्पादन कमी झालं आणि त्यामुळे भाव वाढल्याचं कारण बाजारात देण्यात येत आहे. दरम्यान, कोंबड्यांमध्ये आरडी नावाचा रोग पसरला असल्याची चर्चा आहे.
त्यामुळे अंड्यांच्या उत्पादनांमध्ये घट झाली आहे. या रोगामुळे कोंबड्यांना पोटदुखीचा त्रास होतो. त्यामुळे उत्पादनांमध्ये घट झाल्याचं बोललं जात आहे. तर एकीकडे ही अफवा असल्याचंही सांगण्यात येतं. पण या सगळ्यात सर्वसामान्यांची मात्र फसवणूक होते.