अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- कोरोनामुळे गेले अनेक महिने शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. यामुळे शाळा सुरु करण्याच्या दिशेने पाऊले उचलली जात आहे.
यातच अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती समोर येत आहे. इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या प्रवेश फेरीची कार्यवाही रविवार (दि.20) पासून सुरु होणार आहे. पहिल्या विशेष फेरीची प्रवेश यादी २४ डिसेंबरला जाहीर होणार आहे.
दुसरी विशेष फेरी २७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये एक लाख १६ हजार ११९ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. वाणिज्य शाखेतील प्रवेशासाठी यावेळी स्पर्धा पाहायला मिळाली. तिसऱ्या फेरीसाठी वाणिज्य शाखेच्या ६३ हजार ३५९ जागा होत्या, तर ७४ हजार ५३६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.
म्हणजेच उपलब्ध जागांपेक्षा जवळपास दहा हजार अर्ज जास्त आहेत. २८ हजार ८३९ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले. विशेष फेरीसाठी कोट्यातील शिल्लक जागा समाविष्ट होणार आहेत. उपलब्ध जागांच्या तुलनेत उत्सुक विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.
असे असेल अकरावीच्या विद्यार्थ्यांचे वेळापत्रक