रिलायन्सची आणखी एक मोठी कामगिरी; टॉप -50 मध्ये आली कंपनी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-जगातील ५ व्या क्रमांकावर श्रीमंत असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आणखी एक विक्रम रचला. अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मूल्य 13 लाख करोड़च्या पुढे गेले आहे.

ही जगातील 48 व्या क्रमांकाची मूल्यवान कंपनी बनली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील क्रूड ऑईल, रिफायनरी, पेट्रोकेमिकल,

रिटेल आणि टेलिकॉम क्षेत्रात काम करणारी प्रमुख कंपनी आहे. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार रिलायन्स जगातील बाजाराच्या मूल्यांकनाच्या बाबतीत 48 व्या क्रमांकाची कंपनी आहे.

सौदी अरामको 1700 अरब डॉलरसह पहिल्या क्रमांकावर  
सौदी अरामको ही जगातील सर्वात मूल्य असणारी कंपनी आहे. तिचे  1,700 अब्ज डॉलरचे बाजार भांडवल आहे. त्यानंतर अनुक्रमे अँपल, मायक्रोसॉफ्ट, ऍमेझॉन आणि अल्फाबेट (गुगल) आहे.

गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर २.82 टक्के वाढून बीएसई वर 2,060.65 वर बंद झाला. यामुळे कंपनीचे बाजार मूल्यांकन 13 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले.

कंपनीने नुकताच जारी केलेला राइट्स इश्यू आणि इतर शेअर्सचा स्वतंत्र व्यवहार झाला. कंपनीचे एकूण बाजार मूल्य  13 .5 लाख कोटी रुपये म्हणजे 181 अब्ज डॉलर्स इतके आहे.

आशिया खंडातील पहिल्या दहापैकी रिलायन्स
यापूर्वी कोणत्याही भारतीय कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन 13 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडू शकला नाही. रिलायन्सचे बाजार मूल्यांकनदेखील शेवरॉनच्या  170  अब्ज डॉलर्सच्या बाजार भांडवलापेक्षा अधिक आहे.

युनिलिव्हर, ओरेकल, बँक ऑफ चायना, बीएसपी ग्रुप, रॉयल डच शेल आणि सॉफ्ट बँक यांची रँकिंगही रिलायन्सच्या खाली आहे. रिलायन्स आशियात पहिल्या दहामध्ये आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24