अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-भारताच्या वतीने कोरोना विषाणूच्या साथीमुळे चीनकडे जाणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली होती. पण चीनचे नागरिक खास व्हिसाद्वारे इतर देशांतून भारतात येत होते.
मात्र आता एक महत्वाची माहिती समोर येत आहे. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे परिस्थिती बदलत आहे.
विमान कंपन्यांना नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने चीनी नागरिकांना भारतात येणार्या विमानात चढू न देण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, यासंदर्भात औपचारिकरित्या कोणताही आदेश देण्यात आलेला नाही आणि केवळ अनौपचारिक आदेशानुसार एअरलाइन्सना तसे करण्यास सांगितले गेले आहे.
भारताने हे पाऊल चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी उचलले आहे. तेथील बंदरांवर तब्बल दीड हजार भारतीय फसले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांवर काम करणारे भारतीय मायदेशी परतू शकत नाहीत कारण त्यांना चीन परवानगी देत नाही आहे.
या आठवड्यात यावर सवाल उपस्थित केला असता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा चेंडू स्थानिक अधिकाऱ्यांच्या कोर्टात टाकला. मात्र अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की कोणत्याही लोकल ऑथॉरिटीच्या परवानगीची गरज नाही.
चीनच्या सरकारने काही नियमांची लिस्ट पाठवली आहे मात्र भारतीय अधिकाऱ्यांच्या मते हे केवळ त्रास देण्याच्या हेतून केले आहे. सहा महिन्यांपासून चीनच्या बंदरावर अडकलेत भारतीय जहाज गेल्या सहा महिन्यांपासून चीनच्या बंदरांवर दोन भारतीय मालवाहू जहाज अडकले आहेत.
एकूण ३९ भारतीयांसह दोन मालवाहू जहाजे चीनच्या समुद्रात नांगर टाकून आहेत कारण त्यांना माल उतरवण्यास परवानगी मिळालेली नाही. ही जहाजे चीनच्या हेबेई स्थित उत्तर प्रांतात जिंगटांग आणि कॉफिडियनच्या चीनच्या बंदरांमध्ये अडकली आहेत.
दोन्ही जहाजातून माल उतरवण्याची परवानगी मिळालेली नाही. दरम्यान, चीनकडून परवानगी का नाकारली जात आहे याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.