भारत

Apple iPhone 14 Buying Tips : आयफोन ऑनलाइन की ऑफलाइन कसा खरेदी करावा, कुठे मिळतायेत स्वस्त? जाणून घ्या सविस्तर

Published by
Ahmednagarlive24 Office

Apple iPhone 14 Buying Tips : देशातील तरुणांमध्ये आयफोन बाबत एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. तसेच अनेक तरुणांचे आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न असते. तसेच दिवसेंदिवस आयफोनची विक्री देखील वाढत आहे. पण अनेकांच्या मनात असा प्रश्न पडतो की आयफोन ऑनलाईन खरेदी करावा की ऑफलाईन खरेदी करावा.

सध्या देशात नुकतीच आयफोन स्टोअर्स उघडण्यास सुरुवात झाली आहे. ॲपलने सध्या मुंबईत 18 एप्रिल रोजी आणि दिल्लीमध्ये 20 एप्रिल रोजी ॲपल स्टोअर्स उघडली आहेत. त्यामुळे अनेकांच्या मनात आयफोन स्टोअर्समध्ये स्वस्त मिळणार की ऑनलाईन स्वस्त मिळणार याबाबत शंका निर्माण झाली आहे.

आयफोन 14 ची ऑनलाइन किंमत

जर तुम्हालाही आयफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही Flipkart, Amazon आणि Croma सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवरून खरेदी करू शकता. तसेच इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर देखील आयफोन १४ उपलब्ध आहेत.

iPhone 14 बेस व्हेरिएंटची ई-कॉमर्स वेबसाईटवर किंमत 71999 रुपये निश्चित करण्यात आली आहे तर या फोनची मूळ किंमत 79990 रुपये आहे. ई-कॉमर्स वेबसाईटकडून तुम्हाला ऑफर्स दिल्या जात असल्याने आयफोन कमी किमतीमध्ये मिळत आहे.

iPhone 14 वर ऑनलाइन सवलत आणि ऑफर

Flipkart, Amazon आणि Croma iPhone 14 साठी HDFC बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 4,000 रुपये सूट दिली जात आहे. फ्लिपकार्टकडून आयफोन 14 वर 29250 एक्स्चेंज ऑफर दिली जात आहे.

तसेच Amazon ई-कॉमर्स प्लॅफॉर्म्सकडून 22700 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. त्यामुळे जर तुम्हाला आयफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता.

खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ऑफलाईन स्टोअर्सपेक्षा ऑनलाईनच खरेदी करा. कारण ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन खरेदी केल्याने तुम्हाला अधिक ऑफर मिळत आहे.

त्यामुळे सध्या तरी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने आयफोन खरेदी करणेच फायद्याचे ठरू शकते. मात्र आता येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला आयफोन स्टोअर्समध्ये देखील अनेक ऑफर्स पाहायला मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही आयफोन खरेदी करताना ऑफलाईन आणि ऑनलाईन किंमत पाहून खरेदी करू शकता.

Ahmednagarlive24 Office