भारत

PM Kisan Beneficiary List : अर्रर्रर्र! या 20 लाख शेतकऱ्यांना मिळणार नाहीत 13व्या हप्त्याचे पैसे, पहा यादीत तुमचे तर नाव नाही ना?

Published by
Ahmednagarlive24 Office

PM Kisan Beneficiary List : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत म्हणून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये दिले जातात. मात्र आता लाखो शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे मिळणार नाहीत.

शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेद्वारे वर्षातून ३ हफ्त्यांमध्ये ६ हजार रुपये वितरित केले जातात. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात एक हफ्ता वर्ग केला जातो. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी थोडा का होईना आर्थिक हातभार लागत आहे.

अल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होत आहे. या योजनेचे आतापर्यंत १२ हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. लवकरच केंद्र सरकारकडून १३ वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाऊ शकतो.

मात्र त्याआधी काही शेतकऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. जे शेतकरी या योजनेसाठी अपात्र आहेत अशा शेतकऱ्यांना १३ वा हफ्ता मिळणार नाही. अपात्र असतानाही काही शेतकरी या योजनेचा लाभ घेत असल्याने सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

जर तुम्हीही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अपात्र यादी तपासू शकता. त्यामध्ये तुमचे नाव आहे की नाही त्यानंतर तुम्हाला कळेल.

सरकारकडून शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याचे पैसे 17 ऑक्टोबर 2022 देण्यात आले होते. आता लवकरच १३ व्या हफ्त्याचे पैसे फेब्रुवारी 2023 मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले जाणार आहेत.

21 लाख शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत बऱ्याच दिवसांपासून सरकारकडे तक्रारी येत होत्या. अशा स्थितीत मोठे पाऊल उचलत या योजनेत सहभागी असलेल्या अपात्रांना योजनेतून काढून टाकण्यात आले आहे.

तहसील स्तरावर जमिनीची प्रत्यक्ष पडताळणी केल्यानंतर तक्रारी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत. यामध्ये सर्वाधिक अपात्र शेतकरी उत्तर प्रदेशामध्ये आढळून आले आहेत.

ई-केवायसी करणे आवश्यक

पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आपले आहे. जर शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नाही तर शेतकऱ्यांना पुढील १३ व्या हफ्त्याचे पैसे मिळणार नाहीत.

Ahmednagarlive24 Office