Artificial Intelligence : जगातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनातील सर्वकाही गोष्टी सहज करणे शक्य झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील अनेक कंपन्यांनी लाखो कर्मचाऱ्यांच्या हातात नारळ दिला आहे. तसेच अजूनही अनेक कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत.
जगभरातील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याचे एकच कारण आहे ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI). आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक कंपन्यांनी नोकरकपात केली आहे. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे सर्वकाही सहज करणे शक्य झाले आहे.
सध्या जगभरात आता अनेकजण AI च्या मदतीने अनेक काम करत आहेत. कोणी चित्र बनावट आहे तर कोणी पैसे कमवत आहे. कोणी 21 वर्षाच्या रामाचे चित्र बनवत आहे. तर कुणी रामायणातील पात्रे जिवंत केली आहेत.
सध्या जगभरात AIचाच बोलबाला सुरु आहे. आता AI पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याचे कारण म्हणजे AI भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक पुरुष नेत्यांचा महिला अवतार बनवला आहे.
खालील नेत्यांचा AI ने महिला अवतार बनवला आहे. त्यामुळे तुम्ही हे नेते महिला असते तर कसे दिसले असते याचा अंदाज लावू शकता. तसेच अमेरिकेचे माजी राष्ट्रपती ट्रम्प यांचाही महिला अवतार बनवला आहे.
नरेंद्र मोदी
अमित शहा
राहुल गांधी
योगी आदित्यनाथ
लालू प्रसाद यादव
ट्रम्प
AI-व्युत्पन्न प्रतिमा काय आहे?
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तुम्ही कोणत्याही पुरुष व्यक्तीचे महिला असत्या तर कश्या दिसल्या असत्या याचे चित्र तयार करू शकता. दिवसेंदिवस AI ची लोकप्रियता वाढत चालली आहे. पहिली AI-व्युत्पन्न प्रतिमा प्रणाली, अॅरॉन, हेरॉल्ड कोहेन यांनी 1960 च्या सुरुवातीस तयार केली होती. गेल्या दशकात या क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले आहेत.