अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-देशभर कोरोना लसीकरण सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र आपण आताच ही लस घेणार नसल्याचे सांगितले.
त्यामागील कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे.अहमदनगर मध्ये एका हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी आले असताना शरद पवार यांनी हे विधान केल आहे.
शरद पवार म्हणाले, ‘कोरोनावरील लस उत्पादित करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टय्युटचे मालक सायरस पुनावाला माझे वर्ग मित्र आहेत. सहा महिन्यांपूर्वी मी तेथे गेलो होतो.
त्यावेळी त्यांनी मला तू जास्त फिरत असतोस, तेव्हा प्रतिकार शक्ती वाढविणारी लस घे, असे म्हणत मला बीसीजीची लस दिली होती.
नुकतीच या कंपनीच्या दुसऱ्या एका युनिटला आग लागली होती. त्याची पाहणी करण्यासाठी मी गेलो होतो. तेव्हा पुनावाला यांनी मला करोनाची लस टोचून घेण्याचा अग्रह केला.
मात्र, मी म्हणलो आता मी नगरला निघालो आहे. तेथे दोन खासगी हॉस्पिटलची उद्घाटने आहेत. तेथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतो. परिस्थिती गंभीर वाटली तर मुंबईला न जाता पुण्यात येऊन लस टोचून घेतो.
मात्र, आज येथे आपण आढावा घेतला तर बरे होण्याचे प्रमाण खूपच चांगले आहे. परिस्थिती सुधारत असल्याचे एकूण चित्र दिसत आहे. त्यामुळे आता मी पुण्याला लस घेण्यासाठी न जाता सरळ मुंबईला जातो.
’ “मोदींचं एक वाक्य आहे की ‘दो गज की दुरी’ मात्र मीही पाळत नाही आणि तुम्हीही पाळत नाही. असं असलं तरी आपण काळजी घेण्याची गरज आहे.
आता इंग्लंडला पुन्हा 35 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आलाय,” असं सांगत शरद पवार यांनी नागरिकांना संसर्गाच्या धोक्याची जाणीव करुन दिली.