Ather 450S Electric Scooter : लवकरच लॉन्च होणार शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर, Honda Activa आणि OLA ला देणार टक्कर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ather 450S Electric Scooter : भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या जात आहेत. तसेच अजूनही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या जात आहेत. तसेच इलेक्ट्रिक स्कूटरच्या मागणीत देखील वाढ झाली आहे.

इलेक्ट्रिक स्कूटरच्या मागणीतील वाढ पाहता आता अनेक कंपन्यांकडून इलेक्ट्रिक स्कूटर निर्मितीकडे लक्ष दिले जात आहे. Ather कंपनीकडून अगोदरच इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या गेल्या आहेत. तसेच या कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरची लोकप्रियता देखील वाढू लागली आहे.

आता Ather ची आणखी एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच भारतीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे. Ather 450S ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच लॉन्च होणार आहे.

ही इलेक्ट्रिक स्कूटर 450X प्रो व्हेरियंटमधून प्रगत असल्याचे सांगितले जाते. यामध्ये 7-इंचाचा कलर टीएफटी स्क्रीन मिळू शकतो. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.5 लाख रुपयांच्या आसपास असू शकते.

Ather 450S इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच लॉन्च होईल

होंडा अ‍ॅक्टिव्हाला टक्कर देण्यासाठी Ather कंपनीकडून नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली जाणार आहे. पण या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत Honda स्कूटर्सपेक्षा खूप जास्त आहे.

FAME II अंतर्गत, Ather वर भारत सरकारकडून 55,500 रुपयांची सबसिडी दिली जात आहे. जर तुम्हाला ही सबसिडी मिळाली तर इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत सुमारे 76, 0000 रुपये असेल. त्यामुळे ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला होंडा Activa पेक्षा स्वस्त मिळत आहे.

Ather च्या या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 7-इंचाची TFT टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, ऑटो होल्ड आणि विविध ड्रायव्हिंग मोड यांसारखी उत्कृष्ट वैशिष्ट्ये देण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

कंपनी लवकरच घोषणा करू शकते

सध्या, Ather 450S इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमत, लूक आणि फीचर्सबाबत देखील कोणतीही माहिती कंपनीकडून शेअर करण्यात आलेली नाही. पण 2023 मध्येच कंपनीकडून Ather 450S इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली जाऊ शकते.