Electric Scooter : देशात इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना इंधनावरील वाहने वापरणे न परवडण्यासारखे झाले आहे. हे ओळखून अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने निर्मिती करण्यावर अधिक भर दिला आहे. अनके कंपन्यांची इलेक्ट्रिक वाहने बाजारात उपलब्ध आहेत.
आता ग्राहकांचाही इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याकडे अधिक कल वाढत चालला आहे. सध्या इलेक्ट्रिक वाहनांची किंमत जास्त असली तरी एकदा खरेदी केल्यानंतर पुन्हा इंधन भरण्याची गरज नाही. त्यामुळे या ठिकाणी ग्राहकांच्या पैशांची मोठी बचत होत आहे.
Ather Energy इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीकडून नवीन-जनरेशन Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात आली आहे. या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीकडून अनेक नवनवीन फीचर्स देण्यात आले आहेत.
Ather ने 450X इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन थांबवले आहे आणि जनरेशन 3 आवृत्तीसाठी बुकिंग सुरु केले आहे. 20 जुलै 2022 पासून नवीन मॉडेल इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी सुरू झाली आहे.
वैशिष्ट्ये
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीकडून अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत. या स्कूटरचे टॉप स्पीड 80 किमी प्रतितास देण्यात आले आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर ३.३ सेकंदात ०-४० किमी प्रतितास वेग पकडू शकते. स्कूटरला 7-इंचाचा LCD टचस्क्रीन डिस्प्ले मिळतो, जो LED बॅकलाइट फंक्शनसह येतो
Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटरचे वजन 108 kg देण्यात आले आहे. Ather कंपनीची ही सर्वात हलकी स्कूटर आहे. ही स्कूटर 26 Nm टॉर्क जनरेट करते.
या स्कूटरची बॅटरी 200 4V देण्यात आली आहे. जी तुम्हाला बजाज डोमिनार 250 मध्येही मिळणार नाही.
किंमती
भारतातील सध्या इलेक्ट्रिक वाहनांची किंमत जास्त आहे. त्यामुळे अनेकांना ती खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे कंपनीकडून EMI पर्याय देखील दिला जात आहे. Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1,37,195 रुपयांपासून सुरु होते आणि 1,60,205 पर्यंत जाते.