Electric Hero Splendor : मस्तच! सर्वाधिक लोकप्रिय हिरो स्प्लेंडर बाईक इलेक्ट्रिक रूपात होणार लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Electric Hero Splendor : ऑटो क्षेत्रातील सर्वाधिक खप असणारी आणि सर्वांची लोकप्रिय बाईक हिरो स्प्लेंडर आता इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये येणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना आणखी एक नवीन बाईक इलेक्ट्रिक स्वरूपात मिळणार आहे.

हिरो स्प्लेंडर बाईक आता इलेक्ट्रिक रूपात येणार असल्याने ग्राहक या बाईकच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या हिरो स्प्लेंडर पेट्रोल व्हर्जनला सर्वाधिक मागणी आहे. तसेच ग्राहकांकडून या बाईकला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

हिरो स्प्लेंडर प्लस बाईक उत्कृष्ट डिझाइन, शक्तिशाली इंजिन आणि उच्च मायलेजसाठी ओळखली जाते. कंपनीकडून बाईकमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. तसेच आता आणखी एक मोठा बदल म्हणजे ही बाईक इलेक्ट्रिक रूपात लॉन्च केली जाणार आहे.

हिरो स्प्लेंडर बाईक इलेक्ट्रिक व्हर्जनसाठी ग्राहक मोठ्या उत्साहात आहेत. लवकरच कंपनीकडून Hero Splendor चे इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे. २०२३ मध्येच याच वर्षी कंपनीकडून Hero Splendor चे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च केले जाऊ शकते.

इलेक्ट्रिक हीरो स्प्लेंडर प्लस इलेक्ट्रिक बाईकची बातमी इंटरनेटवर खूप दिवसांपासून व्हायरल होत होती. सध्या भारतीय रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्व दुचाकी उत्पादक कंपन्या त्यांच्या बाईक इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लॉन्च करत आहेत.

तुमच्या जुन्या हिरो स्प्लेंडर प्लसला इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये रूपांतरित करा

सध्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत मोठी वाढ होत असल्याने ऑटो कंपन्या देखील जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहने उत्पादित करण्यावर भर देत आहेत. हिरो कंपनीकडून इलेकट्रीक बाईकबद्दल अजून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

पण जर तुम्हाला तुमची जुनी हिरो स्प्लेंडर बाईक इलेक्ट्रिक रूपात करायची असेल तर इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट बाजारात उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या जुन्या स्प्लेंडर प्लसला इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये बदलू शकता.

हे Hero Splendor Plus Electric Convert Kit GoGoA1 कंपनीने बनवले आहे. ज्याची किंमत कंपनीने 35000 रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय कंपनी इतर बाईक आणि स्कूटरसाठी हे इलेक्ट्रिक कन्व्हर्ट किट बनवण्याचा विचार करत आहे.