भारत

Tata Nexon : मस्तच! टाटा नेक्सॉन नव्या रूपात करणार एन्ट्री, जाणून घ्या जबरदस्त वैशिष्ट्ये

Published by
Ahmednagarlive24 Office

Tata Nexon : टाटा मोटर्स कंपनीच्या अनेक कार भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात अधिक लोकप्रिय झाल्या आहेत. तसेच टाटा कंपनीची Nexon ही कार सर्वाधिक खप होणारी कार ठरली आहे. या कारमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच किंमतही कमी आहे.

टाटा कंपनीने Nexon कारचे अनेक मॉडेल बाजारात सादर केले आहेत. या सर्व मॉडेलला ग्राहकही भरभरून प्रतिसाद देत आहेत. आता कंपनीकडून Nexon कारचे नवीन मॉडेल सादर केले जाऊ शकते. या कारमध्ये कंपनीकडून ADAS वैशिष्ट्ये दिले जाऊ शकते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार टाटा कंपनी Nexon चे नवीन मॉडेल सादर करणार

येत्या काही महिन्यांत टाटा कंपनी टाटा नेक्सॉन फेसलिफ्टमध्ये प्रगत वैशिष्ट्ये जोडू शकते, याशिवाय, कंपनी आपल्या इतर 4 मीटर एसयूव्हीमध्ये हे वैशिष्ट्य जोडण्याची तयारी करत आहे, ज्यामध्ये टाटा पंचचे नाव देखील येत आहे.

समोर सध्या, MG Aster आणि Honda City फेसलिफ्ट या AdAS वैशिष्ट्यांसह देशातील सर्वात स्वस्त कार आहेत. कंपनीने Tata Nexon मध्ये प्रगत सुरक्षा जोडल्यास, वैशिष्ट्ये ऑफर करणारी ती पहिली परवडणारी कंपनी बनेल.

असे असणार कारचे बाह्य स्वरूप

सध्याच्या Nexon कारमध्ये असणारी बाह्य रचना नवीन मॉडेलमध्ये शकते. कंपनीकडून बाहेरील बाजूस आधुनिक एलईडी डीआरएल सेटअप, हेडलाइट पोझिशनिंग आणि जबरदस्त डिझाइनसह फेसलिफ्ट करण्याची शक्यता आहे.

कंपनीकडून नवीन मॉडेल Nexon ची चाचणी सुरु

सध्या कंपनीकडून बाजारात सादर करण्यात आलेल्या Nexon कारला ग्राहक चांगला प्रतिसाद देत आहेत. तसेच ही कार मायलेजही चांगले देत असल्याने ग्राहकही आकर्षित होत आहेत. कंपनीकडून नवीन Nexon मॉडेलची चाचणी सुरु करण्यात आली आहे.

नवीन मॉडेल Nexon वैशिष्ट्ये

टाटा नेक्सॉन सध्या डिझेल इंजिन आणि पेट्रोल पर्यायामध्ये उपलब्ध आहे. कारचे डिझेल इंजिन 1497 cc आहे तर पेट्रोल इंजिन 1199 cc आहे. हे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. नेक्सॉन कार 24.07 kmpl मायलेज देते.

Ahmednagarlive24 Office