भारत

अयोध्या झाकी है, काशी-मथुरा बाकी है : महंत भास्करगिरी महाराज

Published by
Ahmednagarlive24 Office

अयोध्या तो झाकी आहे, काशी आणि मथुरा बाकी आहे,असे प्रतिपादन भास्करगिरी महाराज यांनी श्रीरामपूर येथे अयोध्या येथून आलेल्या कलशांच्या पूजन कार्यक्रम प्रसंगी केले.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्येहून आणलेल्या अक्षता कलशांची काल बुधवारी (दि.१३) सकाळी येथील हनुमान मंदिर, रेल्व स्थानकापासून शोभायात्रा मेनरोड वरील श्रीराम मंदिर मार्गे स्वयंवर मंगल कार्यालयापर्यंत निघाली होती. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी विहिप केंद्रिय सहमंत्री दादा वेदक म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक व विश्व हिंदू परिषदेचे स्व. अशोक सिंघल यांनी सर्व हिंदू समाजाला व साधू-संताना घेऊन श्रीराम जन्मभूमी आंदोलन यशस्वी केले.

त्यांच्यामुळे अयोध्येतील श्रीरामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठाचे सुवर्ण दिवस आपण पाहत आहे. विनय कटियार यांनी बजरंग दलाचे ५ लाख बजरंगीसह लाखो कारसेवक घेऊन आंदोलन यशस्वी केल्याचे आज विसरता येणार नाही.

अयोध्येतील बहुप्रतीक्षित श्रीराम मंदिर उभारणीचे काम अंतिम टप्यात आले आहे. (दि. २२) जानेवारीला या मंदिरात प्रभू श्रीरामलल्ला यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकारातून काढलेल्या शोभायात्रा व अक्षदा कलश वाटप कार्यक्रमात विहिप केंद्रिय सदस्य महंत भास्करगिरी महाराज, महंत रामगिरी महाराज, महेश व्यास महाराज, विहिंप केंद्रिय सहमंत्री वादा वेदक, प्रांत प्रज्ञाशी सदस्य प्रभाकर शिंदे, दुर्गवाहिनी प्रांतसंयोजिका अमृता नळकांडे, रा.स्व. संघाचे संघचालक भरत निमसे, जिल्हा अध्यक्ष अनिल थोरात,

विश्व हिंदू परिषद जिल्हामंत्री श्रीकांत नळकांडे, अभियान प्रमुख यमना आघाव, श्रीरामपूर अभियान प्रमुख कुणाल करंडे, प्रशांत बहिरट, विशाल वाकचौरे, आदींसह शहर व तालुका, जिल्ह्यातील हिंदुत्ववादी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी येथील श्री हनुमान मंदिर, श्रीराम मंदिर येथे श्रीराम तरुण मंडळ, श्रीराम सेवा संघ, हिंद सेवा मंडळ, शंभुराजे मित्र मंडळ, मेन रोड मित्र मंडळ, श्रीराम तालीम ग्रुप, सावता रोड मित्र मंडळ, डॉ. हेडगेवार चौक येथे सुदर्शन नागरी पतसंस्था, काच मंदिर जगदंबा ढोल ताशा पथक,

श्रीरामपूर प्रतिष्ठान, भगतसिंग मिन्न मंडळ, सिद्धिविनायक हनुमान मंदिर येथे शंभुराजे प्रतिष्ठान, काळाराम मंदिर येथे नाना केटरर्स, मराठा बहुउद्देशीय प्रतिष्ठान यांनी ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करून शोभायात्रेत सहभागी झाले.

Ahmednagarlive24 Office