भारत

Baba Vanga’s Prediction : २०२४ मध्ये काय काय होणार ? अशी आहे बाबा वांगाची भविष्यवाणी…

Published by
Ahmednagarlive24 Office

नॉस्ट्रेडेमसने भविष्य कथन केले आणि ते जमेल त्या भाषेत लिहून ठेवले. त्याचे अर्थ लावून त्यांचे अनुयायी वर्षाच्या शेवटाला आगामी वर्षाचे भविष्य कथन करतात. अशाच पद्धतीने बाबा वांगा या नावाने ख्यातनाम असलेल्या महिलेचेही भविष्य कथन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

महत्त्वाचे म्हणजे दोघांच्या भविष्य कथनात पुतीन यांचा खून ही सामायिक घटना दिसून आली. फ्रान्समधली अंध महिला बाबा वांगा या नावाने ओळखली जाते. तिला बाल्कनची नॉस्ट्रेडेमस असेही संबोधले जाते.

वयाच्या ८५ व्या वर्षी म्हणजेच १९९७ मध्ये तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी तिने बऱ्याच भविष्यसूचक घटनांचे कथन केले होते. अमेरिकेवरील ९/११ चा हल्ला त्यापैकीच एक मानला जातो. याचे तिने तंतोतंत भविष्य सांगितले होते.

२०२३ साठी तिने आण्विक प्रकल्पात स्फोट आणि त्यामुळे पृथ्वीची कक्षा बदलण्याचे भविष्य केले होते. आतपर्यंत तरी या दोन्ही घटनांपैकी एकही घडलेली नाही आणि वर्ष संपायला आणखी ३० दिवस शिल्लक आहेत.

२०२४ हे खूपच विचित्र घटनांनी भरलेले वर्ष असेल असे बाबा वांगा सांगते. तिच्या म्हणण्यानुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची हत्या होण्याची शक्यता आहे. ही हत्या त्यांच्या देशातल्या नागरिकाकडून होईल, असे भाकीत बाबा वांगाने केले आहे.

महत्त्वाचे म्हणजे रशियातला टेलिग्राम चॅनल ‘जनरल एसएव्हीआर’ ने पुतीन यांचा मृत्यू झाला असून त्यांचे बाडी डबल्स सध्या रशियात वावरत आहेत, अशी माहिती दिली होती.

अर्थात ही माहिती चुकीची असल्याचे नंतर उघडकीस आले. यावर युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रवक्ते आन्द्रे युसोव्ह यांनी याबाबत सांगितले की, रशिया मुद्दाम अशा खोट्या बातम्या पसरवून पुतीन यांची लोकप्रियता जोखत आहे.

बाबा वांगा यांनी युरोपबद्दल महत्त्वाचे भाकीत केले आहे. युरोप दहशतवादाचा हिडीस चेहरा २०२४ मध्ये बघणार आहे. सर्वात मोठा देश जैविक अस्त्रांची चाचणी करेल किंवा जैविक हल्ल्याला बळी पडेल. २०२४ मध्ये किरणोत्सर्गाचे प्रमाण वाढेल.

जगातली एकूणच कर्ज स्थिती वाढलेली असेल. जागतिक सत्तेचा मुख्य आस हा पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे. याशिवाय इंधन ही आर्थिक अरिष्ट म्हणून समोर येईल.

सायबर चाचे मोठे हल्ले यावर्षी करतील. एखाद्या देशाच्या पावर ग्रीडवर सायबर हल्ला शक्य आहे. याशिवाय पाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या केंद्रावरही हल्ला होण्याची शक्यता आहे.

या हल्ल्यातून राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. संगणकाचा वेग वाढेल. याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ताही आकाश व्यापेल. कॅन्सर आणि अल्झायमरच्या रुग्णांसाठी आनंदाची बातमी २०२४ साल देईल. या दुर्धर आजारांवर औषध तयार होईल

Ahmednagarlive24 Office