भारत

Ration Card New Update : मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी वाईट बातमी! सरकारने उचलले मोठे पाऊल, आता या लाभार्थ्यांना मिळणार नाही धान्य…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ration Card New Update : केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून देशातील गरीब नागरिकांसाठी रेशन कार्ड योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना दरमहा कमी दरात गहू, तांदूळ आणि इतर गोष्टी दिल्या जातात. मात्र आता मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे.

केंद्र सरकारकडून कोरोना काळापासून देशातील शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य वाटप केले जात आहे. तसेच अर्थसंकल्पामध्ये २०२४ पर्यंत मोफत धान्य वाटपाची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना २०२४ पर्यंत मोफत धान्य मिळणार आहे.

मात्र सरकारकडून आता मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. अनेक नागरिकांच्या शिधापत्रिका रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना आता मोफत धान्य मिळणार नाही.

आगामी निवडणूका पाहता केंद्र सरकारकडून अनेक मोठे निर्णय घेण्यात येत आहेत. २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून २०२४ पर्यंत मोफत धान्य वाटप केले जाणार आहे.

सरकारकडून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व सुविधा ऑनलाइन आणि सुलभ करण्यावर सरकार भर देत आहे. यासोबतच योजनांमधील अपात्रांना काढण्याची मोहीम शासनाकडून सुरू करण्यात आली आहे.

9 लाख बनावट शिधापत्रिका रद्द

देशात अनेक अपात्र नागरिक मोफत रेशनचा लाभ घेत आहेत. अशा नागरिकांविरोधात सरकारने मोहीम सुरु केली आहे. ९ लाख बनावट शिधापत्रिका धारकांना या योजनेतून काढून टाकण्यात आले आहे. आयकर भरणारे आणि सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेतून काढून टाकण्यात आले आहे.

80 कोटी लोकांना मोफत रेशन दिले जात आहे

देशातील शिधापत्रिकाधारकांना केंद्र सरकारकडून कोरोना काळापासून मोफत धान्य वाटप केले जात आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (PMGKAY) अंतर्गत केंद्र सरकारकडून देशातील 80 कोटी गरीब कुटुंबांना मोफत रेशनचे वाटप केले जात आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य दिले जात आहे. यासाठी सरकारकडून काही अटी आणि शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. मात्र अपात्र असूनही काही लोक या योजनेचा फायदा घेत आहेत. त्यामुळे सरकारकडून अपात्र लोकांना योजनेतून काढून टाकण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office