Badrinath Dham Yatra : देशातील हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मानली जाणाऱ्या तीर्थस्थानांची दरवाजे उघडले आहेत. चार धाम यात्रा तुम्हालाही करायची असेल तर आता चारही धामची कपाटे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे तुम्ही चार धामची यात्रा करू शकता.
दरवर्षी देशातील लाखो भाविक आणि पर्यटक चार धाम या हिंदूंच्या पवित्र तीर्थस्थानी भेट असतात. यंदाही लाखो पर्यटक आणि भाविकांनी चार धाम यात्रेसाठी नोंदणी केली आहे. त्यांच्यासाठी आता चारही धामची कपाटे खुली करण्यात आली आहेत.
22 एप्रिल रोजी गंगोत्री आणि यमुनोत्री धामची कपाटे खुली करण्यात आली आहेत. तर 25 एप्रिलला केदारनाथचे कपाट उघडण्यात आले आहे. तसेच आज २७ एप्रिल रोजी बद्रीनाथ धामचे कपाट भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.
बद्रीनाथ धामचे कपाट उघडताना मंदिरावर 15 क्विंटल झेंडूच्या फुलांनी सजावट करण्यात आली होती. तसेच अनेक भाविकांच्या साक्षीने बद्रीनाथ आणि इतर धामची कपाटे खुली करण्यात आली आहेत.
आज २७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी बद्रीनाथ धामचे कपाट हजारी भाविकांच्या साक्षीने खुलं करण्यात आले आहे. बद्रीनाथ धाम मंदिराचे विराट सिंहद्वार आणि मंदिर हजारो टन फुलांनी सजवण्यात आले होते.
बर्फवृष्टी आणि पावसात बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले
सध्या चार धाममधील केदारनाथ आणि बद्रीनाथमध्ये बर्फवृष्टी आणि पाऊस सुरु आहे. पाऊस आणि बर्फवृष्टीदरम्यान या दोन्ही धामचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. बद्रीनाथ धामच्या आजूबाजूचा परिसर बर्फाने झाकलेला आहे, एक फुटापेक्षा जास्त उंचीचा बर्फाचा थर सर्वत्र गोठला आहे. अशा परिस्थितीत प्रचंड बर्फवृष्टी आणि खराब हवामान असतानाही हजारो भाविकांच्या साक्षीने मंदिराचे दरवाजे उघडले.
भाविकांच्या सोयीसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी
अलीकडेच उत्तराखंड सरकारने चार धाम यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी एक अॅडव्हायजरी जारी केली होती. या सल्लागारात त्यांनी भाविकांच्या सोयीसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.
पर्यटन विभागाचा चारधाम नियंत्रण कक्ष-0135-2559898, 255627चारधाम टोल फ्री क्रमांक- 0135-1364, 0135-3520100, आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण केंद्र-0135-276066, टोल फ्री क्रमांक-107, आरोग्य नियंत्रण कक्ष-1070, आरोग्य कक्ष 1070 सेवा-104, 108