Categories: भारत

बळीराजा आक्रमक! 8 डिसेंबरला देशव्यापी बंदची शेतकऱ्यांची हाक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातून शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात असून गेल्या काही दिवसांपासून त्या बद्दल आंदोलन ही सुरु आहे. याच पार्श्वभुमीवर येत्या 8 डिसेंबरला शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे.

शेतकरी नेते हरविंदर सिंग लखवाल यांनी सांगितले आहे की, कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 9 वा दिवस आहे. हे आंदोलन चिघळत चालले आहे. त्यामुळे येत्या मंगळवारी 8 डिसेंबरला भारत बंदची देण्यात आली आहे. आंदोलनाला मोठे स्वरुप देण्यासाठी दिल्लीतील रस्ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही आंदोलन करत आहोत. पण सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाहीये. सरकार आम्हाला कमी लेखत आहे, असा संताप व्यक्त करतानाच सरकारच्या या हेकेखोरपणाचा निषेध म्हणून येत्या भारत बंदची हाक देण्यात येत असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

शेतकरी आंदोलन संपूर्ण भारतात सुरू आहे. जोपर्यंत सरकार कायदा मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन देशातील प्रत्येक राज्यात आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. संशोधन नको, कायदा मागे घ्या अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. प्रत्येक राज्यात शेतकरी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात एक अर्ज दाखल करण्यात आला असून त्यात म्हटले आहे की, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शेतकऱ्यांना तात्काळ दिल्लीच्या सीमेवरुन हटवण्याचे निर्देश द्यावे. अर्जदाराचे वकील ओम प्रकाश परिहार याबाबत माहिती दिली. परंतु, या अर्जावरील सुनावणीचा दिवस अद्याप ठरलेला नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24