टोळधाडीपासून बचावासाठी बँड, फटाके वाजवा; गृहमंत्र्यांचा सल्ला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 : राज्यातील शेतकऱ्यांसमोर कोरोनाने खूप मोठे संकट उभे केले. त्यातून शेतकरी अजून सावरला नाही तोच त्याच्या समोर टोळधाडीचे संकट येऊन उभे ठाकले आहे.

यापासून पिकांचे रक्षण करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शेतकऱ्यांना शेतात बँड आणि फटाके फोडण्याचा सल्ला दिला आहे.

ते म्हणतात फटाक्याच्या धुराने टोळ पिकांच्या जवळपास फिरकणार नाहीत टोळधाडीने काटोल तालुक्यातील कचारी सावंगा, सोनपुर, गणेशपुर, शेकापुर आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

ही माहिती मिळताच गृहमंत्र्यांनी रात्री साडेनऊ वाजता टोळधाड असलेल्या भागात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने फवारणी तसेच योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी सुद्धा टोळधाड पासून बचाव करण्यासाठी बँन्ड,फटाके याचे मोठे आवाज करावेत. मोठ्याप्रमाणात धूर करावा त्यामुळे ही टोळधाडी पासून आपण बचाव करू शकतो, असेही देशमुख यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24