सावधान ! ‘ह्या’ राज्यात कोरोनाची दुसरी लाट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :-सध्या भारत देशात कोरोनाचे लाखो रुग्ण आहेत. त्यापैकी अनेक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या रुग्णसंख्येमध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल होते. परंतु मागील काही दिवसांमध्ये हे रुग्ण कमी होऊ लागले आहेत.

परंतु ज्या केरळ राज्यात तुलनेने रुग्ण कमी होते त्या राज्यात दररोजच्या रुग्ण संख्येने महाराष्ट्रालाही मागे टाकलं आहे. शनिवारी केरळमध्ये 7,983 नवे रुग्ण आढळून आले.

कोरोना रुग्णांची संख्या 4,20,166 वर गेली आहे. तर सध्या राज्यात 91,190 जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. महाराष्ट्रात शनिवारी 5 हजार 500 रुग्ण आढळून आलेत. तर 7 हजार 303 जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आलं.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24