सोने खरेदी करण्यापूर्वी ओळखा तुमचं सोनं शुद्ध आहे का

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-दिवाळीत जर तुम्ही सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोन्याच्या शुद्धतेबद्दल माहित असणं आवश्यक आहे.

कारण बर्‍याच वेळा ग्राहक सोन्याची शुद्धता ओळखत नाहीत, यामुळे त्यांचे नुकसान होते. सोनं खरेदी करण्याआधी तुम्हाला 14 कॅरेट ते 24 कॅरेटपासून सोन्याची किंमत माहित असावी.

आज आम्ही तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासण्याच्या पद्धतींबद्दल सांगणार आहोत. BSI करते हॉलमार्क BSI हॉलमार्क ही देशातील एकमेव एजन्सी आहे जी सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी हॉलमार्किंग करते.

भारत सरकारच्या वतीने सोन्याची शुद्धता तपासण्याचे काम या एजन्सीमार्फत केले जाते. आजच्या काळात सर्व ज्वेलर्स हॉलमार्क केलेले दागिने विकत नाहीत.

काहीजण स्वत: हॉलमार्किंग करतात, म्हणून खरेदी करण्यापूर्वी आपण खरेदी केलेल्या दागिन्यांमध्ये बीआयएस हॉलमार्क केलेला आहे की नाही ते पहा.

बीएसआयच्या वेबसाइटनुसार हॉलमार्किंग तीन प्रकारे केले जाते-

  • 22K916: 22 कॅरेट सोन्यासाठी
  • 18K750: 18 कॅरेट सोन्यासाठी
  • 14K585: 14 कॅरेट सोन्यासाठी

शुद्ध सोनं अधिक लवचिक असतं, ज्यामुळे वाकवून त्याचे दागिने बनवता येतात. अधिक शुद्ध, म्हणजे २४ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा आकार लवकर खराब होतो, त्यामुळे नंतर हे सोनं नीट दिसत नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24