Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Best Destinations In India : उन्हाळ्यातील सहलीसाठी ही आहेत सर्वोत्तम पर्यटन स्थळे, तणाव आणि थकवा होईल दूर

Best Destinations In India : धावपळीच्या जीवनात आजकाल अनेकांना फिरायला जाण्यासाठी वेळ नाही. कामाच्या व्यापाने अनेकजण तणावाने आणि थकव्याने त्रस्त झाले आहेत. मात्र जर तुम्हालाही थकवा आणि तणाव दूर करायचा असेल तर काही पर्यटन स्थळांना भेट देऊन तेथील निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्हालाही तुमच्या कुटुंबासोबत किंवा जोडीदारासोबत फिरायला जायचे असेल तर भारतातील काही पर्यटन स्थळे तुमच्यासाठी खास ठरू शकतात. तुम्ही या पर्यटन स्थळांना भेट देऊन काही वेळ शांततेत घालवू शकता.

अलेप्पी, केरळ

केरळमधील अलेप्पी हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण बॅकवॉटर स्पॉट्ससाठी प्रसिद्ध आहे. अंकेजन या ठिकाणी हनिमूनसाठी जात असतात. तर काही जण धावपळीच्या जीवनातील काही वेळ शांततेत घालवण्यासाठी या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात.

ऋषिकेश, उत्तराखंड

ऋषिकेश हे एक उत्तराखंडमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. गंगा नदीच्या काठावर वसलेले भारतातील सर्वात शांत पर्यटन स्थळ आहे. याठिकाणी तुम्ही मोठमोठे पर्वत आणि नदीचे सुंदर दृश्य पाहू शकता. तसेच तुम्ही राफ्टिंगचा देखील आनंद घेऊ शकता.

गोकर्ण, कर्नाटक

गोकर्ण हे कर्नाटकमधील एक स्वच्छ आणि सुंदर पर्यटन स्थळ आहे. या पर्यटन स्थळाला भेट देऊन तुमचा काही क्षण शांततेत घालवू शकता. याठिकाणी तुम्ही मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत फिरायला जाऊ शकता.

ऑरोविल, पाँडिचेरी

हे ठिकाण 1968 मध्ये मीरा अल्फासा यांनी रॉजर अँगर या आर्किटेक्टच्या मदतीने बनवले होते. येथे सुस्थितीत असलेल्या बागांमधून फिरता येते. ऑरोविल हे भारतातील सर्वात शांत पर्यटन स्थळांपैकी एक मानले जाते. या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यत भेट देत असतात.

मसुरी

भारतातील उत्तराखंड राज्यामध्ये तुम्ही उन्हाळ्यात सहलीचे नियोजन करू शकता. कारण या ठिकाणी अनेक पर्यटन ठिकाणे आहेत. तसेच येथील हवा उन्हाळ्यात देखील थंड असते त्यामुळे तुम्ही थंड हवेचा देखील आनंद घेऊ शकता.

उत्तराखंडमधील मसुरी हे एक भारतातील टॉप १० हिल स्टेशनपैकी एक आहे. मसुरीमधील अनेक पर्यटन स्थळांना देखील तुम्ही भेट देऊन सहलीचा आनंद घेऊ शकता.