Best Destinations In India : देशभरातील अनेक नागरिक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. कारण उन्हाळ्यात मुलांना सुट्ट्या असतात त्यामुळे प्रत्येकजण या दिवसांमध्येच फिरायला जातात. पण फिरायला जात असताना पर्यटन स्थळाबाबत माहिती असणे आवश्यक आहे.
अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करतात मात्र त्यांना भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध पर्यटन स्थळांविषयी माहिती नसते. त्यामुळे सर्वात प्रथम पर्यटन स्थळांविषयी माहिती असणे आवश्यक आहे.
कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत फिरायला जाण्यासाठी देशातील अनेक पर्यटन स्थळे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत. त्याठिकाणी तुम्ही देखील भेट देऊन सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये नेहमी थंडगार हवा असणारी पर्यटन स्थळे निवडावीत. कारण उष्णता जास्त असते आणि जर तुम्ही अशी ठिकाणे निवडली नाहीत तर तुम्हाला समस्या निर्माण होऊ शकतात. भारतातील काही प्रसिद्ध हिल स्टेशन किंवा थंडगार हवा असणाऱ्या ठिकाणी तुम्ही देखील या सुट्ट्यांमध्ये भेट देऊ शकता.
दार्जिलिंग
तुम्हालाही तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत फिरायला जायचे असेल तर तुम्ही दार्जिलिंगला भेट देऊ शकता. या ठिकाणी दरवर्षीं लाखो पर्यटक भेट देत असतात. दार्जिलिंगमध्ये मे-जूनमध्ये चांगले हवामान असते यावेळी तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता.
येथील चहाच्या बागा आणि नैसर्गिक दृश्य पाहण्यासाठी तुम्ही याठिकाणी जाऊ शकता. दार्जिलिंगमधील रॉक गार्डन आणि टायगर हिल सारख्या ठिकाणांना देखील तुम्ही भेट देऊ शकता. या ठिकाणी भेट देण्यासाठी तुम्हाला 20 ते 30 हजार रुपये खर्च येऊ शकतात.
अल्मोरा, उत्तराखंड
देशात सध्या उन्हाचा पारा वाढला आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. या उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्यासाठी प्लॅन करत आहेत.
या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही देखील कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत उत्तराखंडमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ अल्मोरा या ठिकाणी भेट देऊ शकता. या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही झिरो पॉइंट, दूनागिरी आणि डीअर पार्कला भेट देऊ शकता. कमी बजेटमध्ये तुम्ही या ठिकाणी फिरू शकता.
अंदमान
तुम्हीही उष्णतेपासून हैराण झाला असाल आणि तुम्हाला थंडगार हवेच्या ठिकाणी सहलीचे नियोजन करायचे असेल तर तुम्ही अंदमानला भेट देऊन सहलीचा आनंद घेऊ शकता. समुद्रकिनारी असलेल्या अंदमान या प्रसिद्ध पर्यटन स्थळाला तुम्ही भेट देऊन तेथील पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 30 ते 50 हजार खर्च येऊ शकतो.
काश्मीर
काश्मीर या पर्यटन स्थळी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. लहान मुलांना घेऊन तुम्ही देखील काश्मीरमधील थंडगार हवेचा आनंद उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये घेऊ शकता. याठिकाणी जाण्यासाठी तुम्ही ट्रेन किंवा बस आणि विमानाचा प्रवास करू शकता. काश्मीरमधील दल सरोवर, गोंडोला आणि शिकाराला भेट देऊन तुम्ही सहलीचा आनंद घेऊ शकता.