Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Best Milk For Health : भारतातील शुद्ध आणि आरोग्यदायी दूध कोणते? पहा तुम्ही पित असलेल्या दुधाचे दुष्परिणाम

Best Milk For Health : भारतात दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच सध्या अनेक कंपन्यांचे दूध बाजारात उपलब्ध आहे. पण तुम्हाला माहिती आहे का भारतातील कोणते दूध सर्वोत्तम आहे. तसेच दुधाचे किती प्रकार आहेत? जाणून घेऊया…

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

भारतातील प्रत्येक स्वयंपाक घरात दुधाचा दररोज वापर केला जातो. तसेच जेवणामध्ये दुधाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. दुधामध्ये पोषक घटक असल्याने दूध हे आरोग्यास सर्वोत्तम मानले जाते.

पण तुम्ही सेवन करत असलेल्या दुध हे आरोग्यास किती लाभदायक आहे. तसेच या दुधामध्ये किती पोषक घटक आढळतात. तुम्ही वापरत असलेले दूध तुमच्यासाठी चांगले आहे का? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

Homogenization Milk म्हणजे काय?

दुधाचा हा एक सर्वोत्तम प्रकार आहे. हे दूध एका मशिनमधून पाठवले जाते. या मशिनमधून दुधातील नको असलेले घटक वेगळे केले जातात. हे दूध जास्त काळ टिकवण्यासाठी तयार केले जाते. तसेच दुधाचे एकजिनसीकरण केले जाते. यामुळे दुधाला चकाकी येते. तसेच दूध जास्त काळ टिकविण्यास मदत होते.

दुधाचे एकजिनसीकरण केल्याने त्यावर मलाई येत नाही. तसेच हे दूध ६ महिने टिकते. त्यामुळे हे दूध तुमच्या शरीरासाठी लाभदायक ठरू शकत नाही. यामुळे अशा दुधाचा वापर करणे नेहमी टाळावे.

Mixed Milk म्हणजे काय?

गाय आणि म्हशीच्या दुधाचे एकत्रीकरण करून ते विकल जाते. या दुधामध्ये जास्त क्रिम असते. मात्र काही कंपनीकडून गायी आणि म्हशीच्या दूध वेगवेगळे करून विकले जाते.

दुधाचे प्रकार

1. दूध पावडर

देशात अनेक कंपन्यांच्या दूध पावडर बाजारात उपलब्ध आहेत. या दूध पावडर A१ दुधापासून बनवल्या जातात. या दूध पावडरमध्ये साखरेचादेखील वापर केला जातो. त्यामुळे खाण्यासाठी या दुधाचा वापर कधीही करू नका.

2. शाकाहारी दूध

हे दूध बदाम, नारळ, तांदूळ यापासून तयार केले जाते. हे दूध बाजारातील इतर दुधापेक्षा जास्त महाग असते. तसेच इतर दुधासारखे पोषक घटक या दुधामध्ये नसतात. त्यामुळे तुम्ही हे दूध खरेदी करणे टाळा. जर तुम्हाला हे दूध लागत असेल तर तुम्ही ते घरबसल्या तयार करू शकता.

3. म्हशीचे दूध

म्हशीचे दूध हे A2 दूध असते. या दुधामध्ये जास्त मलाई असते. त्यामुळे जास्त दिवस हे दूध टिकत नाही. ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी हे दूध आरोग्यदायी आहे. शुद्ध म्हशीचे दूध पिणे कधीही चांगले मानले जाते.

4. शेळी आणि उंटाचे दूध

आयुर्वेदामध्ये शेळीचे दूध आरोग्यास खूप पोषक मानले जाते. कारण या दुधामध्ये खूप पोषक घटक असतात. हे दूध तुमचे आरोग्य चांगले ठेवते. या दुधाचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला अनेक रोगापासून मुक्तता मिळते. तसेच उंटाच्या दुधाचे सेवन केल्याने उंची वाढते. त्यामुळे हे दोन्ही दूध तुमच्या फायद्याचे आहे.

5. देशी गायीचे दूध

देशी गायीचे दूध हे सर्वोत्तम दूध मानले जाते. या दुधामध्ये अनेक पोषक घटक असतात. तसेच हे दूध पचण्यास हलके असते. या दुधापासून शरीरास अनेक पोषक घटक मिळत असतात. या दुधाची किंमत जास्त आहे. आयुर्वेदामध्ये लहान मुलांसाठी हे दूध आईच्या दूधएवढे पोषक असल्याचे मानले गेले आहे.