Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Best Summer Destination : ३ दिवसांची छोटी सहल होईल अविस्मरणीय, द्या या ठिकाणांना भेट…

उन्हाळ्यामध्ये फिरायला जायचे आहे तर काही सुंदर ठिकाणे आहेत त्या ठिकाणी भेट देऊन तुम्ही सहल अविस्मरणीय बनवू शकता. ३ दिवसांच्या सहलीसाठी तुम्ही खालील ठिकाणी जाऊ शकता.

Best Summer Destination : तुम्हालाही फिरायला जायचे आहे आणि सुंदर ठिकाणांच्या शोधात आहात तर भारतामध्ये अशी काही ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी तुम्ही भेट देऊन तुमची सहल आनंददायी बनवू शकता. वीकेंडसाठी सहलीचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी खालील ठिकाणे अविस्मरणीय ठरू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

उन्हाळ्यामध्ये अनेकांना सुट्ट्या असतात त्यामुळे फिरायला जाण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. पण फिरायला कुठे जायचं हा प्रश्न अनेकांना पडत असतो. भारतात अशी काही ठिकाणे आहेत त्या ठिकाणी तुम्ही फिरायला जाऊ शकता.

जवाई, राजस्थान

जर तुम्ही फिरायला जाणयासाठी प्लॅन केला असेल तर राजस्थान एक सुंदर ठिकाण आहे. ज्या ठिकाणी तुम्ही भेट देऊन भारतीय संस्कृती जाणून घेऊ शकता. राजस्थान, देशातील मोठ्या राज्यांपैकी एक, लहान टूरसाठी एक अद्भुत ठिकाण आहे. येथे तुम्हाला अनेक नवीन गोष्टी एक्सप्लोर करण्याची संधी मिळेल.

अमृतसर

अमृतसर हे पर्यटकांचे आकर्षण ठिकाण आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. सुवर्ण मंदिरासारख्या मोठ्या धार्मिक स्थळाने ओळखल्या जाणाऱ्या अमृतसरमध्ये पाहण्यासारखे खूप काही आहे. या ठिकाणी तुम्ही विकेंडसाठी फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता.

उज्जैन

उज्जैनला धार्मिक शहर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी दरवर्षी लाखो धार्मिक लोक भेट देत असतात. ऐतिहासिक वास्तूंपासून ते पोह्यासारख्या स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध असलेल्या उज्जैनचा प्रवास तुम्ही २ ते ३ दिवसांत पूर्ण करू शकता.

आग्रा

जर तुम्हाला ३ दिवसांची सहल करायची असेल तर आग्रा हे ठिकाण सर्वोत्तम आहे. या ठिकाणी भेट देऊन तुम्ही ताजमहाल सारख्या ऐतिहासिक गोष्टी पाहू आग्राचा पेठा असो की इथले इतर स्ट्रीट फूड… प्रत्येकाची चव उत्कृष्ट असते.शकता.

वरील सर्व ठिकाणी तुम्ही ३ दिवसांची सहल आयोजित करू शकता. कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत तुम्ही या ठिकाणांना भेट देऊन आनंद घेऊ शकता. या सुंदर ठिकाणी तुम्ही सुट्ट्यां घालवू शकता.