Best Summer Destination : तुम्हीही या उन्हळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करत असताल आणि तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका. कारण तुम्ही देशातील या सुंदर ठिकाणी कमी पैशात देखील फिरून येऊ शकता. सहकुटुंबासह उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी ही सर्वोत्तम ठिकाणे आहेत.
सहकुटुंब किंवा मित्रांसोबत तुम्ही देशातील ५ सुंदर ठिकाणी फिरून आल्यानंतर तुमचे मन देखील फ्रेश होईल. आज तुम्हाला देशातील ५ सुंदर ठिकाणांबद्दल माहिती सांगत आहोत.
ऋषिकेश
जर तुम्हाला नैसर्गिक हिल स्टेशन पाहण्यासाठी जायचे असेल तर तुम्ही ऋषिकेशला जाऊ शकता. या ठिकाणी दोन दिवस आणि तीन रात्री राहण्यासाठी खाण्यापिण्यासह प्रति व्यक्ती तीन हजारांपेक्षा कमी खर्च येईल.
तुम्हाला ऋषिकेशमध्ये राहण्यासाठी धर्मशाळा हा एक चांगला पर्याय आहे. तुम्हाला खूप कमी दरामध्ये धर्मशाळा उपलब्ध होतील. कमी बजेटमध्ये या ठिकाणी तुम्ही तुमच्या सहलीचे आयोजन करू शकता.
शिमला
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे उष्णता देखील वाढली आहे. जर तुम्हालाही थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जायचे असेल तर शिमला हा एक चांगला पर्याय असू शकतो. येथे तुम्ही टूर पॅकेज घेऊ शकता. 5 ते 6 हजारांच्या आत तुम्हाला टूर पॅकेज मिळेल. यामध्ये तुम्हाला अनेक ठिकाणी फिरवले जाईल आणि राहण्यापासून ते जेवणापर्यंत सर्व खर्च केला जाईल.
कसोल
चंदीगड आणि मनालीजवळ कंसोल हे एक हिल स्टेशन आहे. या ठिकाणी तुम्ही सहलीचे आयोजन करू शकता. या ठिकाणी तुम्हाला ८०० ते ९०० रुपयांमध्ये हॉटेल सहज मिळू शकते. तसेच खाण्यापिण्यासाठी या ठिकाणी सर्वच वस्तू स्वस्त आहेत.
नैनिताल
तलावांचे शहर म्हणून नैनितालला ओळखले जाते. कमी पैशांमध्ये तुम्ही या ठिकाणी प्रवास करू शकता. या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हॉटेल बुक करू शकता. नैनितालमध्ये स्वस्त हॉटेल्स उपलब्ध आहेत.
पंचमढी
मध्य प्रदेशातील पंचमढी हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे, जर तुम्हाला धबधबे पाहण्याची आवड असेल, तर हे ठिकाण तुमच्यासाठी आहे, तसेच तुम्ही इथून सुंदर पर्वतांचे दृश्य पाहू शकता.
येथे दोन दिवस आणि दोन रात्री राहण्यासाठी तुम्हाला दररोज 1000 रुपयांमध्ये हॉटेल मिळेल. शेअरिंग टॅक्सी देखील येथे उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या बजेटमध्ये पंचमढीला जाऊ शकता.