भारत

Best Summer Destinations In India : उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कौटुंबिक सहलीचे नियोजन करताय? तर तुमच्यासाठी ही आहेत सर्वोत्तम पर्यटन स्थळे

Best Summer Destinations In India : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने देशातील शाळांना सुट्टी आहे. शाळांना सुट्टी असल्याने अनेक सरकारी आणि खाजगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी कुटुंबासोबत सुट्यांचा आनंद घेण्यासाठी देशातील वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेट देऊन सहलीचा आनंद घेत असतात.

भारतामध्ये पर्यटकांना खुणावणारी अनेक पर्यटन स्थळे आहेत. दरवर्षी विदेशातून लाखो पर्यटक भारतातील सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळे पाहण्यासाठी येत असतात. तसेच भारतातीलही अनेक लोक सुट्ट्यांमध्ये फिरायला जाणायचा प्लॅन करत असतात.

तुम्हीही या उन्हाळ्यामध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी भारतातील खालील पर्यटन स्थळे सर्वोत्तम ठरू शकतात. अशा पर्यटन स्थळांना भेट देऊन तुम्ही देखील सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता.

1. मेघालय

तुम्हीही या उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी मेघालय हे एक सर्वोत्तम पर्यटन स्थळ आहे. ढगांनी झाकलेले पर्वत आणि सुंदर तलाव पाहण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी या ठिकाणी गर्दी करत असतात.

2. खज्जियार

हिमाचल प्रदेशमधील खज्जियार हे एक अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे. हे एक अतिशय शांत पर्यटन स्थळ मानले जाते. याला मिनी स्वित्झर्लंड असे देखील म्हणतात. या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंगसारख्या साहसी खेळांचा आनंद घेऊ शकता. येथील तलाव आणि नाग मंदिर पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात.

3. कुर्ग

कुर्गला भारताचे स्कॉटलंड असेही म्हणतात. येथील कॉफीचे मळे पर्यटकांना आकर्षित करतात. हे एक अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर हिल स्टेशन आहे. आल्हाददायक हवामानात तुम्ही तलावाच्या सौंदर्याची आणि पाण्याच्या धबधब्याची प्रशंसा करू शकाल.

4. दार्जिलिंग

तुम्ही दार्जिलिंगमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या मुलांसोबत आणि कुटुंबासह घालवू शकता. दार्जिलिंगच्या सुंदर मैदानात तुम्ही टॉय ट्रेनच्या प्रवासाचा आनंद घेऊ शकता. येथे तुम्ही रॉक गार्डन आणि टायगर हिल सारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts