Best Summer Destinations In India : उन्हाळ्यात सहलीसाठी भारतातील ही ४ पर्यटन ठिकाणे आहेत सर्वोत्तम, सहलीचा आनंद होईल दुप्पट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best Summer Destinations In India : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे या दिवसांत अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. पण उष्णता जास्त असल्याने कोणत्या पर्यटन स्थळांना भेट द्यावी हे पर्यटकांना समजत नसते.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळांना सुट्टी असते. त्यामुळे अनेकजण कुटुंबासोबत सहलीला जाण्याचा प्लॅन करत असतात. तुम्हालाही या उन्हाळ्यात कुटुंबासोबत बजेटमधील पर्यटन स्थळांना भेट देईची असेल तर खालील पर्यटन स्थळांना तुम्ही भेट देऊ शकता.

या दिवसांमध्ये उष्णता जास्त असते त्यामुळे थंड हवेची ठिकाणे तुम्ही निवडावीत. अन्यथा तुमच्या कुटुंबासोबत तुम्हालाही कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागू शकतो. तुम्ही भारतातील प्रसिद्ध हिल स्टेशनला भेट देऊन सहलीचा आनंद दुप्पट करू शकता.

1. मसुरी

भारतातील उत्तराखंड राज्यामध्ये तुम्ही उन्हाळ्यात सहलीचे नियोजन करू शकता. कारण या ठिकाणी अनेक पर्यटन ठिकाणे आहेत. तसेच येथील हवा उन्हाळ्यात देखील थंड असते त्यामुळे तुम्ही थंड हवेचा देखील आनंद घेऊ शकता.

उत्तराखंडमधील मसुरी हे एक भारतातील टॉप १० हिल स्टेशनपैकी एक आहे. मसुरीमधील अनेक पर्यटन स्थळांना देखील तुम्ही भेट देऊन सहलीचा आनंद घेऊ शकता.

मसुरीमधील अन्य पर्यटन स्थळे

गनहिल
महापालिका उद्यान
तिबेटी मंदिर
कमल मागचा रस्ता झारीपाणी फॉल
मौल्यवान घसरण
भत्ता पडणे
नाग देवता मंदिर
मसुरी तलाव
ढग समाप्त

2 लडाख

लडाख हे एक भारतातील सुंदर पर्यटन स्थांपैकी एक आहे. भारतातील लाखो पर्यटक दरवर्षी लडाखला बाईक रायडींगचा आनंद घेण्यासाठी जात असतात. उन्हाळ्यात या ठिकाणचे वातावरण अगदी थंड असते त्यामुळे तुम्हाला उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो.

या ठिकाणचे पर्वत आणि सुंदर रस्ते पर्यटकांना आकर्षित करत असतात. तुम्ही या ठिकाणी तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत लडाखला भेट देऊ शकता. लडाखसोबत तुम्ही खालील ठिकाणांना देखील सहज भेट देऊ शकता.

मेग्नेटिक टेकडी
ब्लू पॅंगॉन्ग तलाव
फुगतल मठ
गुरुद्वारा पाथर साहिब
शांती स्तूप खार्दुंग ला पास
स्टॉक पॅलेस
कारगिल
त्सो कार तलाव

3. शिमला

शिमला ही हिमाचल प्रदेशची राजधानी आहे. या ठिकाणी तुम्ही सुंदर नैसर्गिक पर्यटन स्थळे आणि थंड हवेचा आनंद घेऊ शकता. हिमाचल प्रदेशमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. उन्हाळ्यातील बर्फाने झाकलेल्या पर्वतीय टेकड्या आणि बर्फवृष्टीचा आनंद घेऊ शकता. तसेच यासोबतच तुम्ही खालील पर्यटन स्थळांना देखील भेट देऊ शकता.

कुफरी
जाखू मंदिर
समर हिल
चॅडविक फॉल
ग्रीन दरी
हिमालयन बर्ड पार्क

4. ऊटी

ऊटी हे एक उन्हाळ्यात सहलीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. ऊटीला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. उटी हे भारतातील दक्षिणेकडील तमिळनाडू राज्यातील एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत तुम्ही या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. उटीसोबत तुम्ही खालील पर्यटन स्थळांना देखील भेट देऊ शकता.

बॉटनिकल गार्डन
उटी टॉय ट्रेन
पायकारा धबधबा
सेंट स्टीफन चर्च
रोझ गार्डन