भारत

Best Summer Destinations : उन्हाळ्यात कमी खर्चात भारतातील या ५ सुंदर पर्यटन स्थळांना द्या भेट, सहल होईल आनंददायी

Best Summer Destinations : देशातील अनेक नागरिक उन्हाळ्यामध्ये सहलीचे नियोजन करत असतात. पण अनेकांना भारतातील सुंदर पर्यटन स्थळांविषयी माहिती नसते. त्यामुळे अनेकजण विदेशात फिरायला जातात. पण भारतामध्ये अशी काही सुंदर पर्यटन स्थळे आहेत जी तुम्हाला विदेशातील पर्यटन स्थळांचा आनंद देतील.

जर तुम्हीही या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन केला असेल तर तुमच्यासाठी भारतातील काही सुंदर हिल स्टेशन सर्वोत्तम पर्याय आहे. या हिल स्टेशनला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात.

कमी बजेटमध्ये तुम्ही देशातील सुंदर आणि मनमोहक पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता. त्यामुळे तुमची सहल आनंददायी तर होईलच पण पैशांची बचत देखील होईल. चला जाणून घेऊया सुंदर पर्यटन स्थळांविषयी.

ऋषिकेश

तुम्हाला सुंदर पर्वत पाहायचे असतील तर तुम्ही ऋषिकेशला भेट देऊ शकता. या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही मुनी की रेती, वशिष्ठ गुफा, बीटल्स आश्रम आणि लक्ष्मण झुला यासारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता. तसेच घाटावर जाऊन तुम्ही गंगा आरतीचा आनंद घेऊ शकता.

अमृतसर

अमृतसर या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक भेट असतात. या ठिकाणी सुवर्णमंदिर हे आकर्षक ठिकाण आहे. अमृतसरमधील वाघा बॉर्डर, जालियनवाला बाग, रामतीर्थ मंदिर, सद्दा पिंड, पार्टीशन म्युझियम ही ठिकाणे देखील तुम्ही पाहू शकता.

मनाली

उन्हाळ्यामध्ये तुम्ही थंड आणि सुंदर पर्यटन ठिकाण शोधत असाल तर तुम्ही मनालीला भेट देऊ शकता. ऑफ सिझनमध्येही हजारो पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. या ठिकाणी तुम्ही कुटुंबासोबत किंवा जोडीदारासोबत या ठिकाणी फिरायला जाऊ शकता.

श्रीनगर

श्रीनगर हे देशातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. या ठिकाणी तुम्ही विदेशातील अनुभवाचा आनंद घेऊ शकता. श्रीनगरच्या फ्लोटिंग मार्केटला भेट दिल्यास, तुम्हाला बँकॉकच्या फ्लोटिंग मार्केटची आठवण होईल.

लोणावळा

लोणावळा हे एक महाराष्ट्रातील सुंदर हिल स्टेशन आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. कमी बजेट असलेल्या लोकांसाठी हे एक उत्तम ट्रेकिंग डेस्टिनेशन आहे. तुम्हाला लोणावळ्यात सुंदर धबधबे आणि भुशी डॅम सारखी सुंदर ठिकाणे पाहायला मिळतील.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts