Best Summer Destinations : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये या सर्वोत्तम पर्यटन स्थळांना द्या भेट, कमी खर्चात होईल सहल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best Summer Destinations : उन्हाळ्याच्या दिवसांत अनेकजण मुलांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. पण अनेकांना थंड हवेची ठिकाणे माहिती नसतात. त्यामुळे अनेकांची उन्हाळ्यातील सहल फसते आणि त्यांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागतो.

तुम्हीही या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कुटुंबासोबत सुट्टी घालवण्याचा प्लॅन करत असाल तर भारतात काही थंड हवेची ठिकाणे आहेत. त्या ठिकाणांना भेट देऊन तुम्ही तुमच्या सहलीचा आनंद दुप्पट करू शकता.

अनेकांना भारतातील हिल स्टेशनबद्दल माहिती नसते त्यामुळे उन्हाळ्यात थंड हवेचा आनंद घेण्यासाठी विदेशात जात असतात. पण आता तुम्हाला थंड हवेचा आनंद घेईचा असेल तर तुम्ही भारतामध्येच घेऊ शकता.

भारतातील गंगटोक आणि दार्जिलिंगला भेट देण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. येथील नथुला, झिरो पॉइंट, लाचेन आणि लाचुंग पर्यटकांना आकर्षित करतात. येथील वातावरण अगदी थंड असते.

तसेच जर तुमचे बजेट ३५ ते ४० हजार रुपये प्रति व्यक्ती असेल तर तुम्ही शिमला, मनाली, नैनिताल, काश्मीर, वैष्णोदेवी या पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता. तसेच यापेक्षाही तुमचे बजेट कमी असेल इतर तुमच्या जवळील हिल स्टेशनला भेट देऊ शकता.

या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही देखील तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत उत्तराखंडमधील अनेक थंड हवेच्या पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता. उत्तराखंडमध्ये फिरण्यासाठी अनेक पर्यटन स्थळे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत.

किती येईल खर्च

जर तुम्ही फिरायला जाण्यासाठी तेथील पॅकेज घेतले तर तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. कारण यामध्ये तुम्हाला अनेक राहण्यापासून ते खाण्यापर्यंत अनेक सुविधा दिल्या जातात. खालील ठिकाणांच्यानुसार तुम्हाला पॅकेज उपलब्ध असतील.

बिहारमध्ये फिरण्यासाठी तुम्हाला 15 ते 16 हजार रुपयांचे पॅकेज मिळेल. यामध्ये तुम्हाला थ्री स्टार हॉटेलमध्ये चार दिवस राहण्याची सुविधा दिली जाईल.

झारखंडमधील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी तुम्हाला 15 ते 17 हजार रुपयांचे पॅकेज उपलब्ध असेल. यामध्ये तुम्हला थ्री स्टार हॉटेलमध्ये चार दिवस राहण्याची आणि जेवणाची सुविधा दिली जाईल.

तुम्हालाही ओडिशामधील पर्यटन स्थळांना भेट देवीची असेल तर 15 ते 17 हजार रुपयांचे टूर पॅकेज तुम्हाला उपलब्ध असेल. यामध्ये तुम्हला थ्री स्टार हॉटेलमध्ये चार दिवस राहण्याची आणि जेवणाची सुविधा दिली जाईल.

त्रिपुरा मधील पर्यटन स्थळांना भेट देण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी टूर पॅकेज सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. कारण 16 ते 18 हजार रुपयांचे टूर पॅकेज उपलब्ध असेल. यामध्ये तुम्हला थ्री स्टार हॉटेलमध्ये चार दिवस राहण्याची आणि जेवणाची सुविधा दिली जाईल.

तुम्हालाही सिक्कीममधील थंड हवेच्या पर्यटन स्थळांना भेट देईची असेल तर 16 ते 18 हजार रुपयांचे टूर पॅकेज घेऊन तुम्ही पैशांची बचत करू शकता. यामध्ये तुम्हला थ्री स्टार हॉटेलमध्ये चार दिवस राहण्याची आणि जेवणाची सुविधा दिली जाईल.

गोव्याला फिरायला जाण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही याठिकाणी उपलब्ध असलेले 20 ते 22 हजार रुपयांचे टूर पॅकेज खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हला थ्री स्टार हॉटेलमध्ये चार दिवस राहण्याची आणि जेवणाची सुविधा दिली जाईल.

वरील टूर पॅकेज प्रत्येक टूर एजन्सीनुसार बदलू शकतात. त्यामुळे तुम्ही देखील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी किती खर्च येऊ शकतो याचा अंदाज लावू शकता. तसेच बजेटमध्ये सहलीचा आनंद घेऊ शकता.