Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Best Top 5 Smartwatch : ही आहेत देशातील टॉप 5 ब्रँडेड स्मार्टवॉच, किंमत 2 हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या फीचर्स

Best Top 5 Smartwatch : तुम्हालाही नवीन स्मार्टवॉच खरेदी करायचे असेल तर तुम्ही एकदा देशातील टॉप ५ ब्रँडेड स्मार्टवॉच विषयी माहिती करून घेणे गरजेचे आहे. कारण ही टॉप ५ ब्रँडेड स्मार्टवॉच अगदी कमी किमतीमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमच्या पैशांची देखील बचत होईल.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अनेकदा स्मार्टवॉच खरेदी करत असताना बहुतेक लोकांकडून चुका होत असतात. त्यामुळे त्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागतात तर काही वेळा स्मार्टवॉचमध्ये फीचर्स कमी असतात. त्यामुळे आता तुम्ही देखील टॉप ५ ब्रँडेड स्मार्टवॉचपैकी एक खरेदी करू शकता.

BoAt Wave Call Smartwatch

तुम्हालाही स्वस्तात ब्रँडेड स्मार्टवॉच खरेदी करायचे असेल तर तुम्ही देखील BoAt Wave Call स्मार्टवॉच खरेदी करू शकता. हे स्मार्टवॉच अगदी २ हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचमध्ये 1.69 इंच HD डिस्प्ले देण्यात आला आहे. जर तुम्ही हे स्मार्टवॉच Amazon वरून खरेदी केले तर तुम्हाला हे स्मार्टवॉच फक्त 1,799 रुपयांना मिळेल.

FireBolt Talk-2 Smartwatch

भारतीय बाजारपेठेत FireBolt Talk-2 स्मार्टवॉच खूपच लोकप्रिय झाले आहे. या स्मार्टवॉचमध्ये ड्युअल बटण, ब्लूटूथ कॉलिंग, हँड्स ऑन व्हॉईस असिस्टंट, इन बिल्ट माइक, स्पीकर तसेच १२० स्पोर्ट्स मोड यांसारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत. या स्मार्टवॉचची Amazon वर किंमत 1,799 रुपये आहे.

Noise Pulse Go Buzz Smartwatch

तुम्हाला स्मार्टवॉच खरेदी करायचे असेल तर Noise Pulse Go Buzz हे देखील जबरदस्त स्मार्टवॉच आहे. या स्मार्टवॉचमध्ये 1.69-इंचाचा TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. हे स्मार्टवॉच सिंगल चार्जवर ७ दिवस चालेल. Amazon वरून तुम्ही हे स्मार्टवॉच 1,699 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

FireBolt Ninja Call Pro Plus Smartwatch

फायरबोल्टच्या या स्मार्ट घड्याळात तुम्हाला 1.83 इंच हाय-रिझोल्यूशन स्क्रीन पाहायला मिळेल. यासोबतच तुम्हाला ब्लूटूथ कॉलिंगची सुविधाही देण्यात आली आहे. यामध्ये AI व्हर्च्युअल व्हॉईस असिस्टंटसह 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड आणि IP67 रेटिंग आहे. तुम्ही हे स्मार्टवॉच Amazon वरून फक्त 1,799 रुपयांच्या कमी किमतीत खरेदी करू शकता.

Noise Pulse 2 Max Smart Watch

Noise कंपनीची अनेक स्मार्टवॉच भारतीय बाजारात कमी वेळेत अधिक लोकप्रिय झाली आहेत. तुम्ही देखील Noise Pulse 2 Max स्मार्टवॉच अगदी कमी किमतीमध्ये म्हणजेच Amazon वरून 1,799 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

या स्मार्टवॉचमध्ये 1.85 इंचाचा डिस्प्ले आणि 10 दिवस टिकेल इतकी बॅटरी देण्यात आली आहे. तसेच या स्मार्टवॉचमध्ये १०० हून अधिक स्पोर्ट्स मोड्स देण्यात आले आहेत.