भारत

Financial Work Before 31 March : सावधान! 31 मार्चपर्यंत ही ५ महत्वाची कामे ताबडतोब करा, अन्यथा होईल आर्थिक नुकसान

Published by
Ahmednagarlive24 Office

Financial Work Before 31 March : वर्षभरातील मार्च महिना आर्थिक कामांसाठी महत्वाचा मानला जातो. या महिन्यात अनेकजण बँकेसंबंधी किंवा इतर संस्थांसंबंधित मोठे आर्थिक व्यवहार करत असतात. तसेच एप्रिल महिन्यापासून भारताचे नवीन आर्थिक वर्ष सुरु होते.

ज्यांचे आर्थिक व्यवहार जास्त असतात त्यांना ३१ मार्च ही तारीख खूप महत्वाची असते. तसेच जे लोक कर भरतात त्यांनाही ३१ मार्च ही तारीख खूप महत्वाची असते. मार्च महिन्याच्या ३१ तारखेपूर्वी अनेक महत्वाचे कामे करणे गरजेचे आहे.

1. आधार-पॅन कार्ड लिंक करा

केंद्र सरकारकडून आधार कार्ड आणि पॅनकार्ड चे नियम वेळोवेळी बदलले जातात. आता केंद्र सरकारकडून पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ३१ मार्च पूर्वी तुम्हाला हे काम करावे लागणार आहे. अन्यथा पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल.

2. बँकेसोबत केवायसी अपडेट करा

केंद्र सरकारकडून बँक खातेधारकांना ३१ मार्चपर्यंत व्यवहारांमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून KYC अपडेट करण्यास सांगितले आहे. ३१ मार्चपर्यंत KYC अपडेट करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.

3. आगाऊ कर भरणे

भारताच्या आयकर कायद्यानुसार, अनुमानित उत्पन्नाच्या आधारावर आगाऊ कर भरण्याची तरतूद आहे. अनुमानित उत्पन्नाच्या आधारे कर दायित्व 10,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास, अशा करदात्याने आगाऊ कर भरणे आवश्यक आहे.

पहिला हप्ता १५ जून १५%
दुसरा हप्ता १५ सप्टेंबर ४५%
तिसरा हप्ता 15 डिसेंबर 75%
चौथा 15 मार्च 100%

4. कर वाचवण्यासाठी गुंतवणूक करा

जर तुम्हीही करदाते असाल तर तुम्ही ३१ मार्चपूर्वी कर वाचवण्यासाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये पैसे गुंतवू शकता. तसेच राष्ट्रीय पेन्शन योजना, सुकन्या समृद्धी योजना यासारख्या योजनांमध्ये पैसे गुंतवल्यास कराची काही रक्कम वाचवू शकता.

5. प्रलंबित कर भरा

जर ती व्यक्ती कर भरण्यास पात्र असेल तर, लवकरात लवकर प्रलंबित पेमेंट करून कराची थकबाकी भरावी. जर ३१ मार्चनंतर कर भरण्यास दंड आकाराला जातो.

Ahmednagarlive24 Office