भारत

PM Kisan : शेतकऱ्यांनो सावधान! या चुकीमुळे मिळणार नाहीत पीएम किसानचे पैसे; अशी करा ऑनलाईन दुरुस्ती

Published by
Ahmednagarlive24 Office

PM Kisan : केंद्र सरकारने देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे केंद्र सरकार अशा शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत म्हणून पैसे दिले जातात. याचा फायदा करोडो शेतकऱ्यांना होत आहे.

केंद्र सरकारकडून आतापर्यंत शेतकऱ्यांना १३ हफ्ते देण्यात आले आहेत. १३वा हफ्ता काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. पण अजूनही काही शेतकऱ्यांना १३व्या हफ्त्याचे पैसे मिळाले नाहीत. काही चुका झाल्याने अनेक शेतकऱ्यांना १३व्या हफ्त्याचे पैसे मिळाले नाहीत.

केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. हे पैसे शेतकऱ्यांना एका वर्षात ३ हफ्त्यामध्ये दिले जातात. ४ महिन्याला २००० हजार रुपयांचा एक हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.

पंतप्रधान किसान योजना काय आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत देणे हा या योजेचा उद्देश आहे.

या चुकीमुळे पैसे खात्यात येऊ शकत नाहीत

पंतप्रधान किसान सम्मन निधी यांच्या अंतर्गत नोंदणी कारण्यावेळी अनेकवेळा चुकीची माहिती नोंदविली जाऊ शकते. चुकीची माहिती बरोबर देखील केली जाऊ शकते. पण माहिती चुकल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत नाहीत.

चुकीची माहिती रेकॉर्ड केली असल्यास, पंतप्रधान किसान योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या पैशात समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत, जर एखाद्या शेतकर्‍याने पंतप्रधान किसान सम्मन निधी योजना खात्यात तपशील अद्यतनित किंवा संपादित करू इच्छित असाल तर हे काही टप्प्यात केले जाऊ शकते. यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे.

चुकीच्या माहितीमध्ये कसा बदल करायचा

– पंतप्रधान किसान सम्मन निधी ऑनलाईन पोर्टलवर जा.
– फॉर्मर्स कोपऱ्यापर्यंत खाली स्क्रोल करा.
– आधार कार्ड तपशील आणि कॅप्चा भरा.
– शेतकर्‍याचे तपशील पुढील पृष्ठावर पाहिले जातील.
– नंतर खाते तपशील अद्यतनित/संपादित करण्यासाठी संपादनावर टॅप करा.
– आवश्यकतेनुसार तपशील भरणे सुरू ठेवा.
– तपशील अद्यतनित करण्यासाठी सेव्ह वर टॅप करा.

Ahmednagarlive24 Office