7th Pay Commission Update : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA वाढीबाबत निर्णय होणार असल्याच्या चर्चा होत आहेत. १ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे. या बठकीमध्ये DA वाढीस हिरवा कंदील मंत्रिमंडळाकडून दर्शवण्यात आल्याची चर्चा आहे.
पण अजूनही केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA वाढीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. DA वाढीस जरी ग्रीन सिग्नल मिळाला असला तरी सरकारकडून अद्याप घोषणा किंवा कोणतेही परिपत्रक काढण्यात आलेले नाही.
होळीपूर्वी किंवा होळीच्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ होणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र होळी झाली तरीही कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ झालेली नाही. त्यामुळे कर्मचारी वर्ग निराश झाला आहे.
लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक DA वाढीची वाट पाहत आहेत. पण त्यांना अजूनही सरकारकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. DA वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल तसेच पेन्शनधारकांची पेन्शनमध्ये वाढ होईल.
डीए वाढीची माहिती
केंद्र सरकारच्या कर्मचार्यांचा डीए सध्या 38 टक्के आहे. तसेच येत्या काळात कर्मचाऱ्यांचा DA^ ४ टक्क्यांनी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा DA ४२ टक्के होईल. ही DA वाढ कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२३ पासून दिली जाईल.
फिटमेंट फॅक्टर पुनरावृत्ती
केंद्र सरकारच्या कर्मचार्यांसाठी फिटमेंट फॅक्टर सध्या 2.57 टक्के आहे, ज्याची शिफारस 7 व्या वेतन आयोगाने केली होती. पहिल्या सहाव्या वेतन आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार फिटमेंट फॅक्टर 1.86 टक्के होते.
फिटमेंट फॅक्टर आता वाढीव 3.68 टक्क्यांपर्यंत वाढवता येईल, ज्याची मागणी केंद्रीय कर्मचार्यांकडून केली जात आहे. जर सरकार या रकमेसाठी सहमत असेल तर इकॉनॉमिक टाईम्सने अलीकडेच नमूद केल्याप्रमाणे किमान वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढू शकते.
18 महिने डीए थकबाकी
कोरोना काळापासून कर्मचाऱ्यांची DA बाकी आहे. जवळपास १८ महिन्यांची DA बाकी राहिलेली आहे. कर्मचाऱ्यांकडून या DA थकबाकीबाबत सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईत कोणत्याही आर्थिक स्थितीशी सामना करावा लागू नये यासाठी वर्षातून २ वेळा कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ करण्यात येते. मात्र २०२३ या वर्षात अजून एकदाही DA मध्ये वाढ करण्यात आलेली नाही.