Categories: भारत

मोठी बातमी ! उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला; प्रशासन अलर्ट मोडवर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्यामुळे झालेल्या नैसर्गिक प्रकोपात खूप मोठं नुकसान आणि जीवीतहानी झाल्याची माहिती आता समोर आली आहे.

या दुर्घटनेमध्ये मोठे नुकसान झाले असून गंगा नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर अनेकजण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे.

पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे प्रशासनाकडून उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. गंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या लोकांना नदीपासून लांब राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नेमकी घटना काय? जाणून घ्या…. जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात आज सकाळी ही घटना घडली आहे. हिमकडा कोसळून धौली गंगा नदीत कोसळला आहे. त्यामुळे नदीला महापूर आला आहे.

हिमकडा कोसळल्यामुळे धरणाच्या भिंतीचा काही भाग कोसळल्याचे वृत्त आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नदीला महापूर आला असून गावांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उत्तरांखडमध्ये SDRF टीम नदी शेजारी राहणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू करीत आहे. काही गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. अजूनही काही ठिकाणी लोकं अडकलेली आहे.

त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. धौलीगंगा नदीला महापूर आला असून नंदप्रयाग, कर्णप्रयाग, देवप्रयाग, रुद्रप्रयाग या परिसरातील हॉटेल, लॉज आणि घरं खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24