अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :-गुगल, फेसबुक, ट्विटर यासारख्या दिग्गज टेक कंपन्यांनी पाकिस्तानचा निरोप घेण्याची धमकी दिली आहे.
वस्तुतः पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी जाहीर केले की आता ते इंटरनेट सामग्रीवर सेंशरशिप लावतील. हा नियम मोडणाऱ्या कंपनीला दंड आकारला जाईल, ज्याचा विरोध केला जात आहे.
नाविलाजाने व्यवसाय गुंडाळावा लागेल :- जागतिक इंटरनेट कंपन्यांचे प्रतिनिधीत्व करणारी संस्था, आशिया इंटरनेट अलायन्स (ज्यात गूगल, फेसबुक आणि ट्विटरचे सदस्य देखील आहेत) म्हणाले की इंटरनेट कंपन्यांना लक्ष्य करण्याचे नवे कायदे चिंताजनक आहेत.
ते म्हणतात की हा कायदा लागू झाला तर पाकिस्तानमधून नाविलाजाने व्यवसाय गुंडाळावा लागेल. ही संस्था आशियामधील गुगल, फेसबुक आणि ट्विटर सारख्या तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधित्व करते.
3.14 मिलियन डॉलर पर्यंत दंड :- पाकिस्तानी माध्यमांच्या माहितीनुसार, आयटी मंत्रालयाने बुधवारी नवीन नियमांची घोषणा केली.
त्यात म्हटले आहे की सोशल मीडिया कंपन्या आणि इंटरनेट सर्व्हिसेस कंपन्यांना चौकशी एजन्सीज विचारेल ती सर्व माहिती द्यावी लागेल.
यात ग्राहकांची माहिती, ट्राफिक डेटा आणि यूजर डेटा असू शकतो. त्याचबरोबर सोशल मीडिया कंपन्या किंवा इंटरनेट सेवा पुरवणाऱ्यांना इस्लामचा अवमान करणे, दहशतवादाचा प्रचार करणे, द्वेषयुक्त भाषण,
अश्लील साहित्य किंवा कोणत्याही सामग्रीबद्दल 3.14 मिलियन डॉलर दंड आकारला जाईल. त्यानंतर गुगल, फेसबुक आणि ट्विटरसह अनेक कंपन्यांनी असे म्हटले आहे की हाच कायदा कायम राहिल्यास तेथून हा व्यवसाय हटवावा लागेल.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved