भारत

भारतीय कर्णधार रोहित शर्मावर पोलिसांची मोठी कारवाई, 200 च्या स्पीडने भरधाव कार चालवत आला अन…

Published by
Ahmednagarlive24 Office

Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन रोहित शर्मा याच्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रोहित शर्माने मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून आपली आलिशान कार २०० किमी प्रतितास स्पीडने पळवली.

परंतु आता त्याला हे प्रकरण चांगलेच महागात पडले आहे. कारण पोलिसांनी त्याच्यावर ओव्हर स्पीडची कारवाई करत तीन चलान कापले आहेत.

गुरुवारी (दि. १९) ला गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडीयमवर भारताचा सामना होता. या सामन्यासाठी भारतीय टीम बुधवारी पुण्यात आलेली होती. रोहित शर्मा बुधवारी दुपारी मुंबईहून पुण्याला रवाना झाला.

फास्ट ट्रॅकवर पुणे-मुंबईला येताना कॅप्टन रोहितला वेगाने गाडी चालवण्याचा मोह आवरला नाही. द्रुतगती मार्गावर गाडी चालवण्याची मर्यादा ताशी ८० किमी प्रती तास आहे. असा नियम असतानाही

रोहितने आपली कार ताशी २०० किमी वेगाने चालवली. इतकेच नव्हे तर तो अगदी ताशी २१५ किमी प्रतितास वेगावर देखील गेला. अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे हायस्पीड रस्त्यावर तीन ठिकाणी ओव्हरस्पीडिंगची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर अनेक कमेंट्स आल्या आहेत. भारतीय कर्णधाराने असे एकटे फिरणे योग्य नाही. त्याने संघासोबत फिरणे योग्य आहे. तसेच त्याने पोलिस संरक्षणात यावे आणि जावे, अशा पोस्ट व्हायरल होतायेत.

Ahmednagarlive24 Office