भारत

भारतीय संघाला मोठा धोका, सेमीफायनल गाठण्याचं स्वप्न …

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :-अफगाणिस्तानच्या संघाने सुपर १२ च्या मॅचमध्ये स्कॉटलँडला राभूत करत ग्रुप-२ मध्ये अव्वल स्थान मिळविले. अफगाण आर्मीने स्कॉटिश आर्मीचा १३० धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

पण, अफगाणिस्तानचा हा विजय भारतीय संघासाठी खोडा ठरत आहे. दुबई : टी-२० वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला जेतेपदाची सर्वात मोठी दावेदार म्हटले जात होते.

पण पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाने भारतीय संघासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचा पुढील सामना ३१ ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे.

परंतु अफगाणिस्तानच्या स्कॉटलंडविरुद्धच्या धडाकेबाज विजयाने ग्रुप २ मध्ये खळबळ उडाली आहे. भारतीय संघाचे सेमीफायनलला पोहोचण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल का? यावर शंका उपस्थित करण्यात येत आहे.

अफगाणिस्तानच्या संघाने सुपर १२ च्या मॅचमध्ये स्कॉटलँडला पराभूत करत ग्रुप-२ मध्ये अव्वल स्थान मिळविले. अफगाण आर्मीने स्कॉटिश आर्मीचा १३० धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

पण, अफगाणिस्तानचा हा विजय भारतीय संघासाठी खोडा ठरत आहे. सध्या ग्रुप २चा पॉइंट टेबल पाहिला असता, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या खात्यात २-२ गुण आहेत.

मात्र स्कॉटलंडविरुद्ध १३० धावांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर अफगाणिस्तानचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तानकडून झालेल्या दारूण पराभवानंतर भारतीय संघाचा नेट रनरेट उणे ०.९७३ आहे.

Ahmednagarlive24 Office