Billionaires Food Habits : अंबानींपासून ते झुकेरबर्ग पर्यंत कोणत्या आहेत अब्जाधीशांच्या खाण्याच्या सवयी एकदा वाचाच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Billionaires Food Habits : आजकाल अनेकांची जीवनशैली बदलली आहे. चुकीचा आहार आणि व्यसनांमुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. पण आजही असे अनेक लोक आहेत जे आरोग्याकडे खूप लक्ष देतात.

शरीर निरोगी आणि तंदरुस्त ठेवण्यासाठी अनेकजण पोषक आहार घेतात आणि दररोज व्यायाम करत असतात. त्यामुळे तुम्ही आजारांपासून दूर राहता आणि तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते.

पण अनेकवेळा तुम्ही जागतील श्रीमंत लोकांकडे पाहिल्यानंतर तुमच्या मनात विचार येत असेल की या लोकांना कोणते पांढरट आवडतात. तसेच हे लोक तंदुरुस्त राहण्यासाठी काय करतात?

तुमच्या मनात पडलेला प्रश्न अनेकांच्या देखील कधीतरी मनात आला असेल. पण अब्जाधीशांच्या दररोजच्या खाण्यातील पदार्थ जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तसेच अनेकदा ते त्यांच्या खाण्याच्या सवयींबद्दल उघडपणे बोलतात. चला तर जाणून घेऊया अब्जाधीशांच्या खाण्याच्या सवयींबद्दल…

1- सॅम ऑल्टमन

Billionaires Bizarre Food Habits

अनेकदा श्रीमंत लोक अनेक पदार्थांचे शौकीन असतात. ते सतत त्यांच्या खाण्याच्या सवयींबद्दल भाष्य करत असतात. ओपनएआय चॅट जीपीटीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी देखील त्यांच्या खाण्याच्या सवयींबद्दल काही माहिती शेअर केली आहे.

सॅम ऑल्टमन यांनी सांगितले की, ते दररोज भरपूर प्रोटीन शेक पितात. यासोबतच वयावर नियंत्रण ठेवण्यासाठी तो मेटफॉर्मिनच्या गोळ्याही घेतात. तसेच त्यांनी पुढे सांगितले आहे की साखर किंवा अतिरिक्त मसालेदार काहीही खाणे टाळतात कारण या सर्व खाद्यपदार्थांमुळे त्याचे वजन वाढते.

2- मार्क झुकरबर्ग

मार्क झुकरबर्ग हे नाव तर तुम्ही अनेकदा ऐकले असेल. फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी देखील त्यांच्या खाण्याच्या सवयींबद्दल काही माहिती शेअर केली आहे. मार्क झुकरबर्ग हे 2011 पासून तेच प्राणी खातात ज्याची जे त्यांनी स्वतः मारलेले असतात.

त्यांनी सांगितले की, प्रथम लॉबस्टर मारला होता, जो त्यांनी उकळत्या भांड्यात टाकला होता. प्राण्यांची शिकार केल्यानंतर, ते त्यांना कसाईकडे पाठवतात, नंतर ते त्यांचे तुकडे करतात आणि झुकरबर्गला यांना परत करतात.

3- बिल गेट्स

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी देखील त्यांच्या खाण्याच्या सवयींबद्दल काही माहिती २०१४ मध्ये एका ब्लॉगमध्ये शेअर केली आहे. बिल गेट्स जंक फूड जास्त आवडतात. डायट कोक हे त्यांचे आवडते आहे. डायट कोकचे ते एका दिवसांत 3-4 कॅन पितात.

4- वॉरेन बफे

बर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष आणि सीईओ वॉरेन बफे यांनी देखील त्यांच्या आवडत्या पदार्थांविषयी एका मुलाखतीत माहिती दिली आहे. ते हेल्दी ब्रेकफास्ट करण्यापेक्षा आईस्क्रीम खाणे पसंत करतात. वॉरेन बफे हे दुपारच्या जेवणात फ्रेंच फ्राईज खातात. तसेच ते एका दिवसात सुमारे 5 कोका-कोला बाटल्या पितात.

5- एलोन मस्क

टेस्ला, ट्विटर आणि स्पेस एक्सचे संस्थापक एलोन मस्क यांनी नुकतेच ट्विटरवर सांगितले की, त्यांना मिठाई खाण्याची खूप आवड आहे. तसेच, ते नाश्त्यात डोनट्स खातात.

6- मुकेश अंबानी

पति मुकेश अंबानी की ये एक आदत बदलना चाहती हैं नीता अंबानी, सेहत के लिए नहीं मानतीं ठीक | Jansatta

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीईओ मुकेश अंबानी यांनी देखील त्यांच्या आवडत्या पदार्थांबद्दल माहिती शेअर केली आहे. मुकेश अंबानी यांनी दाल चावल सर्वाधिक आवडते. तसेच त्यांना स्ट्रीट फूडही आवडते. स्वाती स्नॅक्सचे खाद्यपदार्थ आणि माटुंगा येथील कॅफे म्हैसूरमधील डोसा हे त्यांचे आवडते पदार्थ आहेत.