भारत

भाजपने आधी जुनी आश्वासने पूर्ण करावी – केजरीवाल

Published by
Mahesh Waghmare

६ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : भाजपने नवी आश्वासने देण्याऐवजी यापूर्वीच्या निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने आधी पूर्ण करावी,असे आव्हान दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिले.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीत ज्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले, ते केंद्र व आप सरकार यांच्या समन्वयातून साकारले आहेत,असा दावाही त्यांनी केला.

पंतप्रधानांनी रविवारी दिल्लीत १२ हजार कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन केल्यानंतर घेतलेल्या एका सभेत आप सरकारवर टीकेची झोड उठवली होती. मोदींच्या या टीकेला केजरीवालांनी पत्रकार परिषदेतून उत्तर दिले.आप सरकार सतत केंद्र सरकारशी भांडत असल्याचा आरोप केला जातो.

आज उद्घाटन झालेली विकासकामे या आरोपांना उत्तर आहे.आप सरकारने केंद्राला पुरेसे सहकार्य केल्यामुळेच ही विकासकामे झाली आहेत.गेल्या दहा वर्षांच्या आमच्या सत्ताकाळात विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे यातून सिद्ध होते,असे केजरीवाल म्हणाले.

यावेळी त्यांनी पंतप्रधानांना २०२० सालच्या निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत ती आधी पूर्ण करण्याचे आव्हान दिले.दिल्लीची जनता भाजपच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांच्या पूर्ततेची अजूनही वाट बघते आहे.

पंतप्रधान आपल्या भाषणात दिल्लीच्या जनतेला आणि सरकारला शिव्या देत होते. मात्र, आम्हाला शिव्या देण्याऐवजी भाजपने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करावीत,असे केजरीवाल म्हणाले.

Mahesh Waghmare

Mahesh Waghmare is a skilled reporter and content writer who has been contributing for the past three years. His work focuses on covering local news, bringing timely and relevant updates to the community. Mahesh’s dedication to delivering accurate and engaging content has made him a trusted voice in local journalism.