अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या बातम्यांपाठोपाठ आता आलेल्या बर्ड फ्लूच्या बातम्या भारतात चांगल्याच चिंतेच्या ठरत आहेत. मात्र आता एक दिलासा देणारी अपडेट यासंदर्भानं आली आहे.
भोपाळच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ऍनिमल डिसीजेस (High security animal digital lab) अर्थात NIHSAD ने दिलासादायक असा अहवाल दिला आहे. NIHSAD च्या अहवालानुसार राजस्थान, केरळ आणि मध्य प्रदेशचे सॅम्पल्स पॉझिटिव्ह मिळाले आहेत.
मात्र कोंबड्या किंवा पोल्ट्रीचे कुठलेच सॅम्पल अजून पॉझिटिव्ह मिळालेले नाही. शिवाय H5N1 स्ट्रेनसुद्धा यात सापडलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवत घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही. मुख्यतः पंजाब, राजस्थान, झारखंड आणि मध्य प्रदेश या चार राज्यांमध्ये पक्षी मोठ्या प्रमाणात मरून पडलेले सापडत आहेत.
पंजाब, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये बर्ड फ्लूबाबत अलर्टही जारी करण्यात आला. मात्र आता कोंबड्यांमध्ये अजूनतरी हा संसर्ग पसरला नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
हे भारतीयांचं मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष? आजार गंभीर होण्याआधीच काळजी घ्या हिमाचल प्रदेशात कांगडा जिल्ह्याच्या पोंग जलाशयाजवळ 2300 स्थलांतरित पक्षी मृतावस्थेत आढळले. प्रतिबंधक उपाय म्हणून तिथल्या सरकारनं जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये पोल्ट्रीचे पक्षी मारत त्यांच्या खरेदी आणि विक्रीवर बंदी घंटाळी.
पशुपालन विभागालाही सरकारनं हा रोग फैलावू नये यासाठी रिस्पॉन्स टीम उभी करण्याचे आदेश दिले. सोबतच केरळमध्ये अलप्पुझा आणि कोट्टायममध्ये 12 हजार बदकं मृतावस्थेत सापडली.
तिथल्या अधिकाऱ्यांनीही दोन्ही जिल्ह्यांच्या एक किलोमीटर परिघात येणाऱ्या सर्व पक्ष्यांना मारण्याचे आदेश दिले. सोबतच राजस्थानच्या झालावाड, जयपूर, कोटा, जोधपूर, दौसा आणि बिकानेर या जिल्ह्यांमध्येही पक्षी मोठ्या संख्येनं मेलेले आढळले. सोमवारपर्यंत तरी मारणाऱ्या पक्ष्यांमध्ये बहुसंख्या ही कावळ्यांची होती.