Tata Punch Car Price : भारतीय ऑटो मोबाईल क्षेत्रातील लोकप्रिय असलेली टाटा मोटर्स कंपनीच्या अनेक कारला ग्राहकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तसेच या कंपनीच्या कार सर्वात सुरक्षित आणि कमी किंमत असल्याने ग्राहकही याकडे आकर्षित होत आहेत.
टाटा मोटर्स भारतात सर्वाधिक विक्री करणाऱ्या कारच्या स्पर्धेत तिसऱ्या नंबरवर पोहोचली आहे. पहिल्या नंबरवर मारुती सुझुकी आहे तर दुसऱ्या नंबरवर ह्युंदाई मोटर्स आहे. मात्र टाटा मोटर्स कंपनी कारच्या बाबतीत ह्युंदाई कंपनीला टक्कर देत आहे.
टाटा मोटर्स कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी कार नेक्सॉन ठरली आहे. तसेच कंपनीची टाटा पंच या कारला देखील ग्राहकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मात्र तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला ही कार कमी किमतीमध्ये मिळेल.
कंपनीकडून टाटा पंच कारमध्ये १२ हजारांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना ही कार खरेदीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. आता टाटा पंच एसयूव्ही कारची किंमत ६ लाख झाली आहे.
1 लाखात टाटा पंच घरी आणा
जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल आणि तुमचे बजेट कमी असेल तर कमी बजेटमध्ये देखील ही कार खरेदी केली जाऊ शकते. तुम्ही १ लाख रुपयांच्या डाउन पेमेंट वर देखील ही कार खरेदी करू शकता.
या कारची तुम्हाला 6.60 लाख रुपये ऑन-रोड मोजावे लागतील. ही कार खरेदी करण्यासाठी अनेक बँका कर्ज देत आहेत. तुम्ही 1 वर्ष ते 7 वर्षांच्या दरम्यान कर्जाचा कालावधी देखील निवडू शकता. येथे बँकेचा व्याजदर 10% आणि कर्जाचा कालावधी 5 वर्षे मानला आहे.
अशा परिस्थितीत, तुम्हाला दरमहा सुमारे 11,900 रुपये EMI भरावे लागेल. तुम्हाला 5 वर्षांमध्ये एकूण कर्जाच्या रकमेसाठी सुमारे 1.5 लाख अतिरिक्त द्यावे लागतील.म्हणजे तुम्ही कारची घेतलेल्या कर्जावर 1.5 लाख व्याज येत आहे.
इंजिन आणि वैशिष्ट्ये
Tata Punch कारला 1.2-लीटर पेट्रोल (86PS/113Nm) इंजिन मिळते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि पर्यायी 5-स्पीड AMT शी जोडलेले आहे. लवकरच तुम्हाला यामध्ये CNG व्हेरिएंट देखील मिळेल.
यात 7-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, ऑटो एअर कंडिशनिंग, ऑटोमॅटिक हेडलाइट्स, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनेल, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि क्रूझ कंट्रोल मिळतात.
विशेष बाब म्हणजे टाटा पंच 5 स्टार सुरक्षा रेटिंगसह येतो. सुरक्षेसाठी यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, एबीएस विथ ईबीडी, रिअर डिफॉगर, रिअर पार्किंग सेन्सर्स, रिअर-व्ह्यू कॅमेरा अशी वैशिष्ट्ये आहेत.