अहमदनगर लाईव्ह24 टीम :- दिल्ली पोलिसांनी बदरपूर भागात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) तोतया असिस्टंट कमांडंटला अटक केली आहे. हा आरोपी स्पर्धात्मक परीक्षेत अनुत्तीर्ण झालेला होता.
यामुळे त्याने प्रेयसी व तिच्या वडिलांवर इम्प्रेशन मारण्यासाठी बीएसएफचा गणवेश घालून तो फिरत होता. साऊथ ईस्टचे पोलिस उपायुक्त आर. एस. मीणा यांनी सांगितले, २७ मार्च रोजी पोलिस गस्तीवर असताना रात्री ९ च्या सुमारास एक व्यक्ती बीएसएफचा गणवेश घालून फिरताना दिसत होती.
पोलिसांनी त्याच्याशी चर्चा केली असता, त्याने स्वत:ला बीएसएफचा असिस्टंट कमांडंट असल्याचे सांगितले. राष्ट्रपती भवनाकडून स्पेशल ड्यूटीवर आलो असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्यास बदरपूर पोलिस ठाण्यात नेले.
त्याला ठाणेदारास ओळखपत्र दाखवता आले नाही किंवा यूनिटच्या डीआयजीचे नावही सांगता आले नाही. त्याची कसून चौकशी केली असता गौरव मिश्रा (२५) असे नाव सांगितले. तो फरिदाबादचा रहिवाशी असून एका कॉल सेंटरवर नोकरी करत असायचा.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com