भारत

Budget Smartphones : खिशाला परवडणारे स्मार्टफोन! खरेदी करा स्वस्तातील टॉप ५ स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत…

Published by
Ahmednagarlive24 Office

Budget Smartphones : तुम्हीही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहेत? तसेच नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी बजेट कमी आहे? तर काळजी करू नका. कारण आता तुमच्या खिशाला परवडणारे ५ स्मार्टफोन तुमच्या आवडीने स्मार्टफोन खरेदी करू शकता.

बाजारात अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्या किमती अधिक असल्याने ग्राहकांना भारीतला स्मार्टफोन खरेदी करता येत नाही. तसेच अनेकांना स्मार्टफोन खरेदी करायचा असतो मात्र कोणता स्मार्टफोन खरेदी करावा हे समजत नाही.

पण आता तुम्ही देखील ५ ब्रँडेड स्मार्टफोनपैकी १ स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकता. या स्मार्टफोनमध्ये अनके दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्हाला स्वस्तात परिपूर्ण फीचर्स असलेले स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

आज तुम्हाला ५ ब्रँडेड स्मार्टफोनविषयी सांगणार आहोत ज्याची किंमत 15,000 रुपये किंवा त्याहून कमी असेल. त्यामुळे कमी बजेट असणाऱ्यांचे स्मार्टफोन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.

OPPO A54 5G

तुम्हाला दमदार फीचर्स आणि स्वस्तातला स्मार्टफोन हवा असेल तर तुम्ही OPPO A54 5G स्मार्टफोन खरेदी करू शकता. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात येत आहे. या स्मार्टफोनची किंमत 14,990 रुपये आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 6.51-इंचाचा पंच-होल डिस्प्ले आणि 13MP चा मुख्य कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi 12C

मजबूत बॅटरी आणि दमदार फीचर्स असणारा Redmi 12C हा स्मार्टफोननं देखील तुम्ही 13999 रुपयांना खरेदी करू शकता. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आलिया आहे. तसेच 50MP मुख्य कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हा स्मार्टफोन 6GB रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज पर्यायासह मिळतो. यामध्ये 6.71-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच हा स्मार्टफोन सध्या ४ रंगांच्या पर्यायामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Moto G13

Motorola G13 या स्मार्टफोनमध्ये देखील अनेक धमाकेदार वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा HD + LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ग्राहकांच्या खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये म्हणजेच 13999 रुपयांच्या किमतीमध्ये हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy M13

सॅमसंग कंपनीचे अनेक स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. तसेच या स्मार्टफोनला ग्राहकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्हाला खिशाला परवडणारा सॅमसंग कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही Galaxy M13 हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

या स्मार्टफनेमध्ये Exynos 850 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 6000mAh बॅटरी देखील देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन दिसायला स्टायलिश असल्याने ग्राहकही चांगलेच आकर्षित होत आहेत. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 11699 रुपये आहे.

Realme Narzo N55

Realme Narzo N55 हा स्मार्टफोन देखील तुमच्या बजेटमधील स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 10,999 आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच हा स्मार्टफोन 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

Ahmednagarlive24 Office