दिवाळीत सराफा बाजाराला तेजीची झळाळी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- दिवाळी आर्थिक उलाढाल झाल्याने बाजारपेठेत नवचैतन्य संचारले आहे. धनतेरस व लक्ष्मीपुजनाच्या शुभ मुहूर्तावर सोने व चांदिचे अलंकार खरेदिला पसंती दिली.

खरेदी विक्रिमुळे सराफा बाजाराला तेजीची झळाळी प्राप्त झाली. सोन्याच्या भावातही तेजी पहायला मिळाली. भाऊबिजेकडुनही सराफा व्यावसायिकांना अपेक्षा आहे. कोरोनामुळे मागील काहि काळात सराफा बाजार झोकाळला होता.

मात्र, दिवाळीमुळे सराफा बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे. सोन्या चांदीच्या वस्तू खरेदीसाठी नाशिककरांनी सराफा बाजारात गर्दी केली होती. सराफा बाजार आणि परिसरातील दालनांमध्ये दोन दिवसांपासुन ग्राहकांची मोठी गर्दी होती.

दोन दिवसांत 45 कोटींहून अधिक उलाढाल झाल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली. धनोत्रयदशी हा सोने खरेदीचा प्रमूख मुहूर्त समजला जातो. धनोत्रयदशीला सोने खरेदी करणे शुभ समजले जाते. हे सोने भरभराट देणारे व अक्षय्य असल्यामुळे अनेक ग्राहकांकडुन खरेदीला प्राधान्य दिले जाते.

पुजेसाठी शुध्द सोने खरेदीकडठे ग्राहकांचा कल असतो. वेढे, पाटल्या, अंगठ्या, चेन, आदींसंह चांदीमध्येही डिनर सेट, पूजेचे साहित्य, लक्ष्मीची मुर्ती, फ्रेम्सना चांगली मागणी होती, 24 कॅरेट सोन्याचा दर शनिवारी जीएसटीसह 53 हजार इतका होता.

तर चांदी देखील जीएसटीसह 66 हजार रूपये किलो होती. पंधरा दिवसांपासुन सोने, चांदीच्या दरात चढ-उतार होत असला तरी मुहूर्तावर योग्य भाव मिळाल्याने मोठ्या प्रमाणात खरेदी केली. प्रतिक्रिया दिवाळित भेटवस्तू म्हणून कंपन्यांनी चांदीच्या वस्तू देण्यास प्राधान्य दिले.

त्यामुळे चांदीच्या वस्तूंना मोठी मागणी होती. तर सोन्याच्या वस्तू देखील गिफ्ट देण्यास प्राधान्य दिले. विजयादशमी नंतर आता दिवाळीला देखील सराफा बाजाराला बुस्ट मिळाला आहे.

दिवाळीच्या दोन दिवसात नाशिकच्या बाजारपेठेत 40 कोटीहून अधिक उलाढाल झाली आहेत. आगामी काळात सोने, चांदीचे दर वाढण्याची शक्यता आहेत. – चेतन राजापूरकर, अध्यक्ष, नाशिक सराफ संघटना

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24